शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

एटीएसच्या कारवाईमुळे मुंबईत आयएसआयचे हस्तक भूमिगत

By admin | Updated: May 9, 2017 01:47 IST

उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसने आयएसआयचे जाळे उद्ध्वस्त केल्याने, मुंबईतील आयएसआयचे हस्तक भूमिगत झाल्याची

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसने आयएसआयचे जाळे उद्ध्वस्त केल्याने, मुंबईतील आयएसआयचे हस्तक भूमिगत झाल्याची शक्यता एटीएसकडून वर्तविण्यात येत आहे. मुंबईतील तीन ते चार तरुणांचा यामध्ये सहभाग असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, यूपी एटीएस त्यांच्या मागावर आहे. मुंबईतून अटक करण्यात आलेल्या जावेद इक्बाल नेवीवाला (३१), अल्ताफ कुरेशी (३३) यांना सोमवारी ट्रान्झिट रिमांडद्वारे लखनऊला रवाना करण्यात आले आहे. तेथे यूपी एटीएसने त्यांचा ताबा घेतला आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसने केलेल्या कारवाईत फैजाबादमधून आयएसआयचा हेर आफताब अली याच्यासह जावेद आणि कुरेशीला मुंबईतून अटक केली. जावेद हा आफताबला पैसे पुरवित होता. मुंबईतील आणखी तीन ते चार तरुण जावेदच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. हे तरुण आयएसआयसाठी काम करत असल्याचा संशय यूपी एटीएसला आहे. त्यानुसार, यूपी एटीएस महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने संशयितांना शोध घेत आहे. मात्र, कारवाईच्या भीतीने ते भूमिगत झाल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. सोमवारी जावेद आणि अल्ताफला यूपी एटीएसने ट्रांन्झिट रिमांडद्वारे न्यायालयात हजर करून ताबा घेतला. मंगळवारी त्यांच्या पोलीस कोठडीसाठी दोघांनाही पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती यूपी एटीएसने दिली आहे. यूपी एटीएसच्या ताब्यात असलेल्या आफताबची कसून चौकशी सुरू आहे. त्यातून अनेक महत्त्वाची माहिती एटीएसच्या हाती लागली असल्याचेही यूपी एटीएसने सांगितले आहे. मंगळवापासून यूपी एटीएस तिघांचीही एकत्रित चौकशी करणार आहे.