शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या नागपाड्यातून आयएसआय एजंटला अटक

By admin | Updated: May 3, 2017 23:07 IST

मुंबईतल्या नागपाड्यातून अल्ताफ कुरेशी नावाच्या एका आयएसआय एटंजला बेड्या ठोकल्या आहेत.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 3 - मुंबईतल्या नागपाड्यातून अल्ताफ कुरेशी नावाच्या एका आयएसआय एटंजला बेड्या ठोकल्या आहेत. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश एटीएसने संयुक्तपणे ही कारवाई केली असून, त्याच्याकडून 70 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. या आयएसआय एजंटला 70 लाख रुपये एवढा पैसा हवालामार्फत मिळाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथक आणि राज्यातील गुप्तचर यंत्रणा आणि लष्कराच्या यंत्रणांनी संयुक्त कारवाई करत रकमेसह आयएसआयच्या एजंटला अटक केली आहे. अल्ताफ कुरेशी हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेसाठी हवाला ऑपरेटर म्हणून काम करायचा. उत्तर प्रदेशातील फैजाबादमधून अटक केलेला आयएसआयच्या संशयित असलेल्या अफताब अली यालाही अल्ताफ कुरेशी पैसे पुरवायचा, अशी माहिती आता समोर आली आहे.गेल्या काही तासांपूर्वीच फैजाबाद येथून पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयच्या एजंट आफताब अलीलाही अटक करण्यात आली होती. याशिवाय एका संशयितालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. आफताब अली हा फैजाबादमधील ख्वासपुरा येथील रहिवासी आहे.आफताब अली याने आयएसआयकडून हेरगिरीचे प्रशिक्षण घेतल्याचं वृत्त असून तो पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता अशी माहिती आहे. आफताबला कोर्टात हजर करण्यात येणार असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. तसेच यापुढील काळात आणखी काही संशयितांना अटक होण्याची शक्यता आहे. दहशतवादविरोधी पथक आणि राज्यातील गुप्तचर यंत्रणा आणि लष्कराच्या यंत्रणांनी संयुक्त कारवाईकरून त्याला आज अटक केली. तो पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता आणि खोट्या नावाने त्यांच्याशी संपर्क साधत होता, अशी माहिती समोर आहे. आफताब अली पाकिस्तानचा व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, अनेकदा त्याचा अर्ज फेटाळून लावला होता. त्याने आयएसआयसाठी काम करणार असल्याचे सांगितल्यानंतर त्याला व्हिसा मिळाला होता, असे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले.