शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

ट्रान्सफॉर्मर बिघडले आहे? शेतकऱ्यांनो इकडे कॉल करा

By सचिन लुंगसे | Updated: December 18, 2022 13:29 IST

गेल्या १७ दिवसांमध्ये नादुरुस्त झालेल्या ७१३८ पैकी ६५१६ रोहित्र केवळ ४८ ते ७२ तासांच्या कालावधीत बदलण्यात आले आहेत.

मुंबई - कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे वितरण रोहीत्र (ट्रान्सफॉर्मर) नादुरुस्त झाल्यास ते तात्काळ बदलण्याची मोहीम सध्या सुरु आहे. ज्या ठिकाणी रोहित्र नादुरुस्त झाले असेल त्यासंबंधीची माहिती शेतकरी बांधवांनी संबंधित कार्यालयात किंवा चोवीस तास सुरु असलेल्या १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर द्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

गेल्या १७ दिवसांमध्ये नादुरुस्त झालेल्या ७१३८ पैकी ६५१६ रोहित्र केवळ ४८ ते ७२ तासांच्या कालावधीत बदलण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये नादुरुस्त झालेले केवळ ६२२ नादुरुस्त रोहीत्र बदलणे शिल्लक असून ते तात्काळ बदलण्यात येत आहेत.  महावितरणकडे सद्यस्थितीत ४ हजार १८ रोहीत्र बदलण्यासाठी अतिरिक्त स्वरुपात उपलब्ध आहेत. 

२९ नोव्हेंबरपूर्वी नादुरुस्त असलेले ६ हजार ९२ व त्यानंतर शनिवारपर्यंत नादुरुस्त झालेले ६ हजार ५१६ असे एकूण १२ हजार ६०८ नादुरुस्त रोहीत्र युद्धपातळीवर बदलण्यात आले आहेत. कृषिपंपांना तीन फेजचा वीजपुरवठा करणारे महावितरणचे राज्यभरात एकूण ७ लाख ५४ हजार वितरण रोहीत्र आहेत. यापूर्वी विविध कारणांमुळे सुमारे ३ हजार ते ३ हजार ५०० रोहीत्र दररोज बदलणे शिल्लक राहत असल्याची परिस्थिती होती.

तथापि यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठ्याचे पाठबळ देण्यासाठी जळालेले किंवा नादुरुस्त झालेले रोहीत्र तात्काळ बदलून देण्याची सूचना महावितरणचे अध्यक्ष विजय सिंघल यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना केली. नादुरुस्त किंवा जळालेले वितरण रोहित्रांची दुरुस्ती करण्यासाठी १९३४ कंत्राटदार एजन्सीजची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे सद्यस्थितीत ११ हजार ६३२ रोहीत्र दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी