शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या पत्नीचे विवाह प्रमाणपत्र की पहिली पत्नी कायदेशीर? मालमत्ता वादात मुंबई कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 16:04 IST

कांदिवली येथील एका फ्लॅटच्या मालकीवरून हा २७ वर्षांचा कायदेशीर वाद सुरू होता. मृत व्यक्तीच्या पहिल्या पत्नीचा दावा फेटाळताना न्यायालयाने हा निर्णय दिला.

मुंबई: विवाहाच्या कायदेशीर वैधतेबाबत मुंबई शहर दिवाणी न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. लग्नाचा अधिकृत पुरावा म्हणून पुरोहिताने दिलेले पत्र नव्हे, तर राज्य सरकारने जारी केलेले विवाह प्रमाणपत्र हेच नेहमी वैध आणि निर्णायक मानले जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

कांदिवली येथील एका फ्लॅटच्या मालकीवरून हा २७ वर्षांचा कायदेशीर वाद सुरू होता. मृत व्यक्तीच्या पहिल्या पत्नीचा दावा फेटाळताना न्यायालयाने हा निर्णय दिला. या महिलेने १९७१ मध्ये लग्न झाल्याचा दावा केला होता. त्यासाठी तिने केवळ पुरोहिताने दिलेले पत्र पुरावा म्हणून सादर केले. हे पत्र विवाहानंतर २७ वर्षांनी, खटला दाखल करण्यापूर्वी मिळवले होते.

तर दुसऱ्या पत्नीने १९८३ मध्ये झालेले लग्न सिद्ध करण्यासाठी सब-रजिस्ट्रारने जारी केलेले अधिकृत विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि सामायिक वास्तव्याचा पुरावा सादर केला होता. या प्रकरणावर न्यायाधीश सी. एस. दातिर यांच्यासमोर सुनावणी पार पडली.

न्यायालयाने पुरोहिताचे पत्र अंतिम पुरावा मानण्यास नकार दिला. विवाह समारंभाचे फोटो किंवा लग्नाला हजर असलेले साक्षीदार हजर न केल्यामुळे, केवळ उशिरा मिळालेल्या पुजाऱ्याच्या पत्राला कोणताही कायदेशीर आधार नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले.

"दोन्ही पक्षांनी सादर केलेल्या कागदपत्रांचे मोलमाप केल्यास, सरकारी सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले विवाह प्रमाणपत्र हे नेहमीच सरस ठरते. कायदेशीर सत्यतेचे प्राबल्य दुसऱ्या पत्नीच्या बाजूने आहे," असे मत न्यायाधीश दातिर यांनी नोंदवले. या निर्णयामुळे विवाह प्रमाणपत्र हे मालमत्ता आणि वारसा हक्काच्या लढाईत सर्वोच्च कायदेशीर दस्तऐवज ठरले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Marriage Certificate Trumps Priest's Letter in Property Dispute: Mumbai Court

Web Summary : Mumbai court ruled a marriage certificate from authorities is stronger proof than a priest's letter in a property dispute. The court favored the second wife's claim, backed by official documentation, over the first wife's reliance on a priest's letter issued long after the alleged marriage.
टॅग्स :Courtन्यायालयmarriageलग्न