शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

सिंचनाचा फक्त खर्चच वाढला, सिंचन नाही!

By admin | Updated: October 5, 2014 01:15 IST

संग्रामपूर येथे पृथ्वीराज चव्हाण यांची अजित पवारांवर टिका.

संग्रामपूर (बुलडाणा) : सिंचनासाठी राज्याने ८२ हजार कोटी रुपयांपैकी ८0 हजार कोटी रुपये खर्च केले; मात्र सिंचनाची क्षमता त्या तुलनेमध्ये वाढली नाही. सिंचनाचे धोरण राबविण्यात चूक झाली अशी कुबूली देत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. भाज पच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला असा आरोपही त्यांनी यावेळी केला.विधानसभा निवडणूक प्रचारासाठी जळगाव जामोद तालुक्यातील वरवट बकाल येथे शनिवारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे बुलडाण्याचे उपाध्यक्ष मनोज देशमुख होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री रामदास बोडखे, रामविजय बुरूंगले, वा.रा. पिसे, अंजलीताई टापरे, अशोक हिंगणे, खालीकबापू देशमुख, डॉ.किशोर केला, तेजराव मारोडे, श्याम डाबरे, संतोष राजनकर, अंबादास बाठे, दयाराम वानखडे, राजू पाटील, डॉ.दलाल, युनूसखां अश्फाक आदींची उपस्थिती होती. आघाडीमुळे अनेक निर्णय घेतांना अडचणी आल्या. विशेषत: स्वच्छ प्रशासनाच्या संदर्भात निर्णय घे ताना अनेकांना अडचणीचे वाटले. आता आघाडी नाही आणि ज्या लाटेमुळे देशात सत्ता स्थापन झाली, ती लाट आता ओसरली आहे. त्यामुळे खिचडी सरकार निवडून देण्यापेक्षा काँग्रेससारख्या पक्षाला पूर्ण बहूमत देण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. जळगाव जामोद मतदारसंघा तील खारपाणपट्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी १४0 गाव पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी राज्य सरकारने निधी दिला. याचे श्रेय अन्य कुणी घेवू नये, केंद्रातून निधी आल्यास त्या योजनेचे श्रेय घ्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. केंद्रातील भाजप सरकारकडून जनतेचा भ्रमनिरास होत आहे. पंधरा वर्षात आघाडीने राज्याची अ र्थव्यवस्था बळकट केली. त्यामुळे देशातील पहिल्या ४ राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाकडे मोदींशिवाय दुसरा चेहरा नाही. कोणातही नवा कार्यक्रम नाही. विकास कामांचे उद्घाटन करुन भाजप सरकार केवळ श्रेय लाटण्याचे काम करीत आहे. मराठा आरक्षण दे ताना इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी सरकारने घेतली, असे चव्हाण यांनी सांगितले.विकासाच्या बाबतीत महाराष्ट्राला नंबर १ वर ठेवण्यासाठी, अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी खिचडी सरकार नको, तत्वशून्य आघाड्याही नको. काँग्रेसला प्रशासनाचा अनुभव आहे, म्हणून काँग्रेसलाच मतदान करा, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले. प्रास्ताविक तेजराव मारोडे यांनी केले. यावेळी रामदास बोडखे, अंजलीताई टापरे, दयाराम वानखडे, राजू पाटील यांचीही समायोचित भाषणे झाली. *सरसंघचालकांच्या भाषणाचे थेट प्रसारण धक्कादायकराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दसर्‍या मेळाव्यातील भाषणाचे थेट प्रसारण करण्याचा केद्र सरकारचा निर्णय धक्कादायक आहे. नागपूरची ही मंडळी एका वर्णाचा व एका धर्माचा विचार करणारे आहेत, बहुजनांचा नाही, अशी अप्रत्यक्ष टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर करून, युती तुटल्याने आता दुध का दुध, व पाणी का पाणी होईल, अशी स् पष्टोक्तीही चव्हाण यांनी केली.