शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महसूल विभागातील बदल्यांमध्ये गैरव्यवहार, विरोधी पक्षनेते दानवे यांचे मुख्य सचिवांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 10:45 IST

राज्यात सरकारी सेवकांच्या बदल्यांचे नियमन व शासकीय कर्तव्य बजावण्यातील विलंबाला प्रतिबंध कायदा २००५ अस्तित्वात आहे.

मुंबई : महसूल विभागात अनेक नियम डावलून झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांना महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) स्थगिती दिल्यानंतर याविरोधात विरोधकही आक्रमक झाले आहेत. कायद्याचे उल्लंघन करून या बदल्या झाल्याचा ठपका मॅटने ठेवला आहे. 

पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार असून, नियमित बदल्यांचे हे शेवटचे वर्ष आहे. त्यामुळे राज्य प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या होत आहेत. महसूल विभागातही मागील आठवड्यात ६० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात तहसीलदार व उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचा समावेश होता. यातील मुदतीपूर्वी झालेल्या बदल्यांविरोधात पाच अधिकाऱ्यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. मॅटने या अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून त्यांच्या बदल्यांना स्थगिती दिली.

राज्यात सरकारी सेवकांच्या बदल्यांचे नियमन व शासकीय कर्तव्य बजावण्यातील विलंबाला प्रतिबंध कायदा २००५ अस्तित्वात आहे. महसूल विभागातील बदल्यांमध्ये या कायद्याचे उल्लंघन झाल्याचा ठपका मॅटने ठेवला आहे. मॅटने दिलेली स्थगिती अंतरिम असून, पुढील सुनावणी १७ जुलै रोजी आहे.

विरोधकांचे आक्षेपया बदल्यांप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहून बदल्यांमधील गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सदर बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून, सदर बदल्यांचे आदेश मध्यरात्री दोनच्या सुमारास काढण्यात येऊन बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना मोबाइलवर संदेश पाठविण्यात आल्याची चर्चा आहे. या बाबी लक्षात घेता, संकेतस्थळावर बदलीचे आदेश प्रसिद्ध न केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.

या अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती     पुणे जिल्ह्यातील खेड येथे तहसीलदार वैशाली वाघमारे यांची तीन वर्षे पूर्ण होण्याआधी त्यांच्या जागेवर दुसऱ्या अधिकाऱ्याची पदस्थापना करण्यात आली होती.   भांडूपचे तहसीलदार रेवणे लेंभे यांची ठाणे कोर्ट नाका येथे मुदतपूर्व बदली करण्यात होती.      पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार अजित कुऱ्हाडे, रायगड जिल्ह्यातील पेणचे तहसीलदार एस. डी. डोईफोडे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील प्रांत अधिकारी मौसमी चौगुले यांचीही मुदतपूर्व बदली करण्यात आली होती.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवे