शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

८० ग्रामपंचायतींकडून ३२५ कोटींची अनियमितता, ‘कॅग’चे ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 03:39 IST

दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत विकासकामांमध्ये सन २०१० ते २०१५ या पाच वर्षांत अनियमितता झाली असून, ८० ग्रामपंचायतींमध्ये मंजूर ६७२ कोटींपैकी तब्बल ३२४.८६ कोटींच्या कामांमध्ये अनियमितता आढळल्याची धक्कादायक बाब ‘कॅग’ने शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

गणेश वासनिक अमरावती : दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत विकासकामांमध्ये सन २०१० ते २०१५ या पाच वर्षांत अनियमितता झाली असून, ८० ग्रामपंचायतींमध्ये मंजूर ६७२ कोटींपैकी तब्बल ३२४.८६ कोटींच्या कामांमध्ये अनियमितता आढळल्याची धक्कादायक बाब ‘कॅग’ने शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.नागपूर महालेखाकार कार्यालयाने औरंगाबाद, अकोला, बीड, चंद्रपूर, लातूर, नाशिक, रत्नागिरी आणि ठाणे आठ जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर मार्च २०१५मध्ये लेखापरीक्षण केले. यात ८० ग्रामपंचायतींच्या १७७पैकी १३६ वस्त्यांमध्ये २०२ कामे मंजूर होती. मात्र, यापैकी ७४ ग्रामपंचायतींमध्ये बृहत् आराखड्यात (डीपीआर) २०१३-२०१८ या पाच वर्षांत प्रत्यक्ष लोकसंख्या ही २०११च्या जनगणनेनुसार, तर उर्वरित सहा ग्रामपंचायतींमध्ये २०११च्या जनगणनेपेक्षा जास्त दर्शविली होती. ८० ग्रामपंचायतींचे डीपीआर तयार होते; मात्र त्यांचे स्वरूप समान नव्हते. ८०पैकी २१ ग्रामपंचायतींमध्ये निष्पादित केलेली ३४ कामे ही डीपीआरमध्ये समाविष्ट नव्हती.दलित वस्त्यांशिवाय इतरत्र कामे करणे, जि.प. कार्यकारी अभियंता लेखा संहिता १९६८चे नियम १६६नुसार कामाला भेटी न देणे, कामाच्या ठिकाणी फलक न लावणे आदी अनियमितता आढळल्या़

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत