शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

दवणेंचे साहित्यिकांच्या विवेकबुद्धीला आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2016 01:46 IST

मराठी साहित्यात दिवाळी अंकाची मोठी परंपरा आहे. साहित्यिक दिवाळी वाचकही चांगल्या प्रकारे साजरी करतात. तेच औचित्य साधत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या

डोंबिवली : मराठी साहित्यात दिवाळी अंकाची मोठी परंपरा आहे. साहित्यिक दिवाळी वाचकही चांगल्या प्रकारे साजरी करतात. तेच औचित्य साधत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिंगणातील उमेदवार, ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे यांनी त्यांच्या प्रचाराला सोशल मीडियातून गती दिली आहे. विवेकबुद्धीच्या दीपाला साक्षी ठेवत साहित्यिकांनी मला मतदान करावे, असे भावनिक आवाहन प्रवीण दवणे यांनी केले आहे. दवणे यांनी मतदारांना आवाहन करणाऱ्या पत्रकात आपल्या साहित्यिक कारकिर्दीचा आढावा घेतला आहे. माझी साहित्य यात्रा वयाच्या दहाव्या वर्षापासून सुरु झाली. त्याला चार दशके पूर्ण झाली आहेत. मराठीतील समृद्ध साहित्याने माझ्या जीवनाला परिमाण दिले. जगण्याचे उद्दीष्ट दिले. संत, पंत आणि तंत व विचारवंत वाङमयाने अभिव्यक्त होण्याची उर्मीही मला दिली. कविता मूळ असले, तरी ललितगद्य, गीते, कांदबरी, नाटक व बालवाङमयात भरपूर मुशाफिरी केली.३५ वर्षांचे मराठीचे अध्यापन, व्याख्याने, नवी पिढी-पालक-शिक्षक हा चिंतनाचा केंद्रबिंदू, युवा पिढीतील संघर्षाने अंतर्मुख केल्याची भावना दवणे यांनी व्यक्त केली. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे युवा व पालकपिढी यांना साहित्य मूल्यविचार देण्याची संधी आहे. हे पद केवळ जीवनअखेरीचा सन्मान न ठरता तो पुढील वाटचालीसाठी साहित्य रसिकांनी दिलेला गंभीर जबाबदारीचा संकेत असेल, यावर दवणे यांनी भर दिला आहे. (प्रतिनिधी)