शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधींच्या पुतळा अनावरणास उपराष्ट्रपती नायडू यांना निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 16:00 IST

दर्डा यांनी मंगळवारी  उपराष्ट्रपतींची  त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन यवतमाळमधील विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली.

विकास झाडे -नवी दिल्ली : महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण याशिवाय वीणादेवी दर्डा डे बोर्डिंग स्कूल  व जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलचे लोकार्पण करण्यासाठी यवतमाळला यावे यासाठीचे निमंत्रण लोकमत समूहाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी  उपराष्ट्रपती  एम. व्यंकय्या नायडू यांना दिले आहे. नायडू यांनी होकार दर्शविला असून येत्या काही दिवसांमध्ये तारीख निश्चित होईल.दर्डा यांनी मंगळवारी  उपराष्ट्रपतींची  त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन यवतमाळमधील विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली.  यवतमाळ येथील हनुमान आखाडा हे स्वातंत्र्याच्या लढ्यातील एक महत्त्वाचे केंद्र होते. स्वातंत्र्य लढ्यातील अनेक नेत्यांनी या आखाड्याला भेट दिली. त्यात सुभाषचंद्र बोस, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, वि. दा. सावरकर, महात्मा गांधी आदींचा समावेश होता. गांधीजींनी या भेटीत ‘मै इस आखाडेकी उन्नती चाहता हूॅँ’, असे आखाड्याच्या नोंदवहीत लिहून ठेवले होते. या आखाड्याला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत;  परंतु कोरोनामुळे इथे कोणतेही कार्यक्रम राबविता आले नाहीत. मात्र, आखाडा व्यवस्थापनाने गांधीजी लिहीत आहेत, असा ९ फुटांचा ब्रॉन्झचा पुतळा सुप्रसिद्ध शिल्पकार पद्मश्री राम सुतार यांच्याकडून तयार केला आहे. या पुतळ्याचे अनावरण करावे, अशी विनंती दर्डा यांनी उपराष्ट्रपतींना केली आहे.

अत्याधुनिक बोर्डिंग स्कूल- यवतमाळला ३० कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक श्रीमती वीणादेवी दर्डा डे बोर्डिंग स्कूल बांधण्यात आले आहे. - त्याचप्रमाणे हिंदी हायस्कूल यवतमाळ येथे जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलचे लोकार्पण करण्याची विनंती  उपराष्ट्रपतींना करण्यात आली. - यावेळी विजय दर्डा यांनी लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी लिहिलेले ‘माझी भिंत’ हे पुस्तक उपराष्ट्रपतींना दिले.