शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी काँग्रेसची महाआघाडी, प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 03:29 IST

सरकारकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसेच नसल्याने शासन (एनपीए) दिवाळखोरीत निघाले असून या सरकारला हद्दपार

अकोला : सरकारकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसेच नसल्याने शासन (एनपीए) दिवाळखोरीत निघाले असून या सरकारला हद्दपार करण्यासाठी येत्या निडणुकीत समविचारी राजकीय पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी स्थापन करणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले.आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी वºहाडात ठिकठिकाणी काँगे्रसचे मंथन शिबिर होत असून, रविवारी अकोला येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले की, मतांचे विभाजन टाळण्यासाठी राज्यातील समविचारी पक्षांची मोट बांधण्यात येत असून, शिवसेना व महाराष्टÑ नवनिर्माण सेना वगळता सर्वच पक्षांना सोबत घेणार आहोत. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनाही या महाआघाडीत येण्याचे निमंत्रण दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.अ‍ॅड. आंबेडकरवरिष्ठांशी बोलतीलमताचे विभाजन टाळण्यासाठी आम्ही भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहोत. तथापि, त्यांना आमच्याशी याबाबत चर्चा करायची नसेल तर कदाचित ते वरिष्ठांसोबत चर्चा करतील, असे चव्हाण यांनी सांगितले....तर ही अखेरची निवडणूक !भाजपा सरकार आता सत्तेवर आले तर ही देशाची शेवटची निवडणूक असेल, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. अविश्वास प्रस्तावावर चर्चा नको म्हणून केंद्रात अद्याप अविश्वास प्रस्ताव दाखल झाला नाही. राज्यात विधानसभा अध्यक्षाविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याअगोदरच चर्चा टाळण्यासाठी विश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला. हे लोकशाहीचे नव्हे तर हुकूमशाहीचे द्योतक आहे. भाजपाला सर्वधर्म समभाव, संविधान नको असल्याने पुन्हा त्यांचे बहुमत आले तर भारतीय राज्यघटनाच हे बदलतील, असा धोकाही चव्हाण यांनी व्यक्त केला.भयमुक्त,भाजपामुक्त भारतभाजपाची विचारसरणी ही एक विष असून, सर्वसामान्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे भय आणि भाजपामुक्त भारत करणे ही काँग्रेसची भूमिका असून, त्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही. त्यानुषंगाने जबाबदारी ओळखून काम करण्याचे आवाहन खा. अशोक चव्हाण यांनी केले.