शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

गुंतवणूकदारांची फसवणूक; यश बिर्लांवर आरोपपत्र

By admin | Updated: October 22, 2016 01:54 IST

बिर्ला पॉवर सोल्यूशन्स लिमिटेड (बीपीएसएल) कंपनीशी संबंधित गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी यश बिर्ला, त्यांचा निकटचा साथीदार अनंत वर्धन आणि अन्य सात जणांवर

मुंबई : बिर्ला पॉवर सोल्यूशन्स लिमिटेड (बीपीएसएल) कंपनीशी संबंधित गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी यश बिर्ला, त्यांचा निकटचा साथीदार अनंत वर्धन आणि अन्य सात जणांवर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. यश हे बिर्ला उद्योग समूहाचे चेअरमन आहेत. सूत्रांनी सांगितले की, विशेष गुंतवणूकदार हित रक्षण न्यायालयात (एमपीआयडी) हे १३ हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. यात फसवणूक (भादंवि कलम ४२0), गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात (४0९) व गुन्हेगारी कट (१२0 ब) हे आरोप ठेवण्यात आले. याशिवाय एमपीआयडी कायद्याचीही संबंधित कलमे लावण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बिर्ला हे कंपनीचे प्रमुख आहेत. त्यांना कंपनीतील अनियमिततांची माहिती होती. त्यामुळे त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले. यापूर्वी केलेल्या चौकशीत त्यांनी आरोपांचा इन्कार केला होता. कंपनीच्या प्रवक्त्याकडून याबाबत प्रतिसाद मिळाला नाही. सूत्रांनुसार, २00९ ते २0१३ या चार वर्षांत बीपीएसएलमधून १८0 कोटींचा गुंतवणूकदारांचा निधी आठ बँक खात्यांच्या माध्यमातून अन्य सहा कंपन्यांत वळता करण्यात आला होता. बिर्ला यांनी मात्र हे आरोप नाकारले होते. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या वर्षी पहिले आरोपपत्र दाखल केले होते. कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी पीव्हीआर मूर्ती यांना त्यात आरोपी करण्यात आले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)पैसा अन्यत्र वळविलाएफआयआरमधील माहितीनुसार, कंपनीने गुंतवणूकदारांना १0.७५ टक्के व्याजदराचे आमिष दाखवून मुदत ठेवीची योजना आणली. या योजनेत ८ हजार गुंतवणूकदारांनी ३00 कोटी रुपये गुंतविले. योजनेनुसार १ वर्षानंतर पैसे परत देण्याऐवजी गुंतवणूकदारांचा पैसा कंपन्यांत वळविला. पोलिसांनी कंपनीच्या १0 मालमत्ता जप्त केल्या आहेत. मुंबईतील बिर्ला हाउस, एक प्लॉट आणि जुहूमधील तीन बंगले यांचा त्यात समावेश आहे. बिर्ला आणि सहयोगी कंपन्यांची डीमॅट खातीही जप्त केली आहेत.