शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

३५ हजार कोटींची राज्यात गुंतवणूक

By admin | Updated: August 9, 2015 04:08 IST

डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनात जगात अव्वल मानली जाणारी फॉक्सकॉन ही कंपनी येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात तब्बल ३५ हजार कोटी रुपयांची (पाच अब्ज डॉलर) गुंतवणूक करणार आहे.

मुंबई : डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनात जगात अव्वल मानली जाणारी फॉक्सकॉन ही कंपनी येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात तब्बल ३५ हजार कोटी रुपयांची (पाच अब्ज डॉलर) गुंतवणूक करणार आहे. यासंबंधीच्या सामंजस्य करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कंपनीचे अध्यक्ष टेरी गाऊ यांच्या उपस्थितीत शनिवारी स्वाक्षरी झाली. राज्यातील ही आजवरची एकाचवेळी होत असलेली सर्वांत मोठी गुंतवणूक असेल. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन, संशोधन आणि विकास हे कार्य या प्रकल्पात होईल. या ठिकाणी ५० हजार नवे रोजगार उपलब्ध होणार आहेत. मुंबई-पुणे मार्गावर किंवा तळेगावनजीक (जि. पुणे) हा प्रकल्प उभारला जाईल. दोन्ही ठिकाणी कंपनीने पाहणी केली असून, जागेची निश्चिती लवकरच केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले ‘मेक इन इंडिया’चे आणि आम्ही त्यास अनुसरून सुरू केलेले ‘मेक इन महाराष्ट्र’चे स्वप्न पूर्ण होणार आहे, असे ते म्हणाले. वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये झालेल्या सामंजस्य करारप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, अतिरीक्त मुख्य सचिव (वित्त) सुधीर श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, उद्योग सचिव अपूर्व चंद्र, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)आयफोन, आयपॅडची निर्मिती...अ‍ॅपल कंपनीची आयपॅड आणि आयफोन ही उत्पादने तसेच अन्य नामवंत कंपन्यांसाठी मोबाईल, डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची निर्मिती करणारी फॉक्सकॉन ही नामवंत कंपनी आहे. तीत १० लाख लोक काम करतात. १९७४ साली तैवानमध्ये नोंदणी झालेल्या या कंपनीने १९८८ पासून चीनमध्ये गुंतवणूक सुरू केली. फॉर्चुनने २०१४ मध्ये जाहीर केलेल्या जगातील सर्वोत्तम ५०० कंपन्यांमध्ये फॉक्सकॉनला ३२ वे नामांकन प्राप्त झाले होते. फॉक्सकॉनच्या समुहात १४ अन्य कंपन्या आहेत. गुंतवणुकीचा आकडा खरा की फुगविलेला?तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष टेरी गाऊ यांनी आपल्या मुलाखतीमध्ये भारतात १० वर्षांत २ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचा मानस व्यक्त केला होता. गाऊ यांची ती मुलाखत खरी मानायची की ही कंपनी येत्या ५ वर्षांत एकट्या महाराष्ट्रात ५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे खरे मानायचे, असा खोचक सवाल माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.