शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

बुलडाणा जिल्ह्यात केबीसीमध्ये ५0 कोटींवर गुंतवणूक

By admin | Updated: July 17, 2014 23:59 IST

अनेकांचे दणाणले धाबे: एजंटांना अटकेची धास्ती

बुलडाणा : सध्या राज्यभरात घोटाळ्यासाठी गाजत असलेल्या केबीसी नामक खासगी गुंतवणूक कंपनीमध्ये, बुलडाणा जिल्ह्यातील नागरीकांनी सुमारे ४0 ते ५0 कोटी रुपयाची गुंतवणुक केल्याची बाब समोर आली आहे. गुंतवणुकदारांमध्ये प्रामुख्याने डॉक्टर व शिक्षकांसह नोकरदार वर्गाचा भरणा असून, एकीकडे गुंतवणूकदार कमालीचे धास्तावलेअसताना, दुसरीकडे कंपनीच्या एजंटांनाही अटकेच्या भीतीने ग्रासले आहे. नाशिक येथे स्थापन करण्यात आलेल्या केबीसी या खासगी गुंतवणूक कंपनीने राष्ट्रीयीकृत बँका व गुंतवणूक कंपन्याच्या तुलनेत दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून, अनेकांना या व्यवसायामध्ये ओढले. सर्वसामान्य गुंतवणूकदाराला एका महिन्यात गुतंवलेल्या रकमेच्या दामदुप्पट रक्कम देण्याचे, तर एजंटांना भरघोस कमिशनचे आमिष दाखविल्यामुळे, अल्पावधीतच बुलडाणा जिल्ह्यात या कंपनीची गुंतवणूक कोट्यावधीच्या घरात गेली. डॉक्टर, वकील व विशेषत: शिक्षक वर्गाने या कंपनीच्या योजनेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याने सामान्य गुंतवणुकदारांचाही विश्‍वास बसला; मात्र काही काळातच कंपनीने आपला खरा रंग दाखविणे सुरू केले. बुलडाणा जिल्ह्यातील एकट्या देऊळगाव राजा तालुक्यात या कंपनीच्या योजनेत ९ ते १0 कोटी रुपयांची ग्राहकांनी गुंतवणुक झाल्याचे समजते. त्या खालोखाल बुलडाणा तालुक्यात ७ ते ८ कोटींची, तर मोताळा तालुक्यात ५ ते ७ कोटींची गुंतवणूक असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे देऊळगाव राजा तालुक्यात एका गुंतवणूकदाराची तर तब्बल एक कोटीची गुंतवणुक असल्याची जोरदार चर्चा आहे.देऊळगाव राजा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत परदेशी यांनी नागरिकांना पुर्ण चौकशी क रूनच गुंतवणूक करणे गरजेचे असल्याचे सांगुन कुणाची फसवणूक झाली असल्यास, त्याने पोलिसांकडे रितसर तक्रार दिल्यास, कारवाई करुन जनतेला न्याय मिळवून देण्यात येईल, असे सांगीतले.