शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दरीत कोसळणा-या युवकांचे शूटिंग करणा-यांची होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2017 19:32 IST

आंबोली घाटातील कावळेसाद पॉईंट येथे सोमवारी संध्याकाळी दारुच्या अमलाखाली स्टंटबाजी करताना दोन युवकांचा खोल दरीत पडून मृत्यू झाला. ही घटना घडली त्यावेळी तिथे अनेकजण उपस्थित होते.

सावंतवाडी, दि. 5 - आंबोली घाटातील कावळेसाद पॉईंट येथे सोमवारी संध्याकाळी दारुच्या अमलाखाली स्टंटबाजी करताना दोन युवकांचा खोल दरीत पडून मृत्यू झाला. ही घटना घडली त्यावेळी तिथे अनेकजण उपस्थित होते. त्यांनी या संपूर्ण घटनेचे मोबाईलवर शूटिंगही केले. आता राज्याचे  गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शूटिंग करणा-यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.  

शनिवारी सायंकाळी त्यांनी कावळेसाद पॉईट येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली. आपत्कालीन विभागाबाबत त्यांनी  मात्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान दोन्ही युवकांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. सोमवारी सायंकाळी गडहिंग्लज येथील पोल्ट्रीत काम करणारे सात जण आंबोली-कावळेसाद येथे फिरायला आले होते. त्यातील दोघे जण मद्यधुंद अवस्थेत मौजमजा करीत असताना खोल दरीत कोसळले. 

त्यानंतर चार दिवस कोल्हापूर व आंबोलीसह सांगेली येथील शोध पथके या युवकांचा शोध घेत होती. पण त्यांना यश येत नव्हते. त्यातच गुरूवारी ( 3 ऑगस्ट ) सायंकाळी कोल्हापूर येथील शोधपथक निघून गेले. त्यानंतर शुक्रवारी ( 4 ऑगस्ट ) सकाळी सांगेली येथील बाबल आल्मेडा व आंबोलीतील किरण नार्वेकर यांनी शोधमोहीम सुरू केली होती.

दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास प्रताप उजगरे याचा मृतदेह खोल दरीच्या पायथ्याला असल्याचा दिसला. त्या मृतदेहापर्यत किरण नार्वेकर व दाजी माळकर पोचले त्यांनी या मृतदेहाला रोप वेच्या साहय्याने बांधले त्यानंतर रोप वे वर ओढून घेण्यात आला.  3 वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह वर काढण्यात शोधपथकासह अन्य साथीदारांना यश आले.

गडहिंग्लज येथील इम्रान गारदी याच्या मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न पथकाने घेतला. पण दाट धुके तसेच पावसाचा प्रवाह मोठा असल्याने त्यात अनेक अडचणी येत असल्याने ही शोधमोहीम सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास थांबविण्यात आली आहे. शनिवारी पुन्हा सुरू करण्यात आलेल्या शोधमोहीमदरम्यान इम्रान गारदीचा मृतदेह पथकाला सापडला. 

पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी जाऊन केली पाहणी आंबोली कावळेसाद पॉईंट येथील खोल दरीत कोसळलेल्या दोन युवकांचे मृतदेह मिळाल्यानंतर शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिक्षातकुमार गेडाम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच पर्यटकांनी धबधब्यावर येतना सावधानता बाळगावी असे आवाहन केले आहे. दारू पिऊन धिंगाणा घालणा-यांवर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील तसेच जादा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे असे पोलीस अधीक्षक डॉ दीक्षांतकुमार गेडाम यांनी सांगितले.