शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय हेतूनं मुंबई महापालिकेच्या कामाची चौकशी; आमदार सचिन अहिरांची टीका

By मंगेश व्यवहारे | Updated: December 12, 2023 10:24 IST

मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी केली जात असताना सत्ताधारी पक्षातील आमदार ठाणे, कल्याणची चौकशी बघताहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम्ही यापूर्वी लावलेला आहे असं सचिन अहिर यांनी सांगितले.

नागपूर : मुंबई महानगरपालिकेच्या मागील २५ वर्षातील अर्थिक व्यवहारांची चौकशी लावणे दुर्दैवी आहे. त्या २५ वर्षांतील २० वर्षे जे आमच्यासोबत होते, तेच आता चौकशीवर चर्चा करताहेत. आगामी निवडणुका लक्षात ठेवून ही चौकशी करण्यात येत आहे. ही कारवाई राजकीय दृष्टीकोनातून आहे, असे शिवसेनेचे (ठाकरे गट) विधान परिषदेचे सदस्य सचिन अहिर विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले. 

ज्यावेळी मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी केली जात असताना सत्ताधारी पक्षातील आमदार ठाणे, कल्याणची चौकशी बघताहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम्ही यापूर्वी लावलेला आहे. त्याची साधी कॅगद्वारे पण चौकशी होत नाहीये. एकीकडे इतर महापालिकेतील भ्रष्टाचारावर कॅगची चौकशी करू द्यायची नाही आणि दुसरीकडे मुंबई महापालिकेची चौकशी करायची, असा प्रकार सुरू आहे. ज्या आयुक्तांच्या कार्यकाळात या सर्व गोष्टी झाल्यात त्यांनाच प्रशासक म्हणून ठेवायचे. पाहिजे त्या गोष्टी करून घ्यायच्या. असलेल्या ठेवीतून शहर स्वच्छ करत असल्याचे दाखवायचे, असा प्रकार सुरू आहे, असे आमदार सचिन अहिर म्हणाले. 

एसआयटीला सामोरे जाणारदिशा सालियान प्रकरणी नेमलेल्या एसआयटीद्वारे आदित्य ठाकरेंना बोलाविले जाणार की नाही, याबाबत अधिकृत माहिती नाही. ही चौकशी पारदर्शकपणे होणे असेल तर आम्ही त्याला सामोरे जाऊ. त्यातून काही न झाल्यास न्यायालयात जाण्याचा पर्याय आमच्यापुढे उघडा आहे. 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनSachin Ahirसचिन अहिरEknath Shindeएकनाथ शिंदेMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका