शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅट्रॉसिटी’च्या १०५६ गुन्ह्यांचा तपास प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 06:15 IST

राज्यात दलित, आदिवासी समाजातील व्यक्तींवरील अत्याचारासंदर्भात वर्षभरात अडीच हजार गुन्हे

राजेश निस्ताने मुंबई : राज्यात दलित, आदिवासी समाजातील व्यक्तींवरील अत्याचारासंदर्भात वर्षभरात अडीच हजार गुन्हे (अ‍ॅट्रॉसिटी) दाखल झाले असून त्यातील १ हजार ५६ गुन्ह्यांचा तपास पोलिसांच्या स्तरावर प्रलंबित आहे. विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने गृहखात्याला पोलीस महासंचालकांनी सादर केलेल्या गोपनीय अहवालातूनच आकडेवारी उघड झाली आहे.गेल्या वर्षभरात राज्यातील नऊ पोलीस परिक्षेत्रात अनुसूचित जाती व जमातीबाबत दोन हजार १५३ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात सर्वाधिक ४६७ गुन्हे कोल्हापूर परिक्षेत्रात आहेत. त्या खालोखाल अमरावती, नाशिक, औरंगाबाद, नांदेड परिक्षेत्राचा क्रमांक लागतो. राज्यात अशा अत्याचाराचे सर्वात कमी ३४ गुन्हे मुंबईत दाखल आहेत. दलित, आदिवासी समाजातील व्यक्तींवरील अत्याचार प्रकरणात दाखल गुन्ह्यांचा वेगाने तपास होऊन ते न्यायप्रविष्ट होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात स्थिती मात्र वेगळी आहे.अशी आहेतप्रलंबिततेची कारणेगुन्ह्यांचा तपास प्रलंबित राहण्यामागे पोलिसांकडून विविध कारणे सांगितली जात आहेत. उच्च न्यायालयात याचिका, अपिल प्रलंबित असणे, आरोपींची अटक बाकी असणे,अधिक पुरावा गोळा करणे,साथीदार तपासणी, चार्जशिटला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा, अपर पोलीस अधीक्षक, सरकारी अभियोक्त्यांचे वेळेत अभिप्राय प्राप्त न होणे, जात प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध न होणे आदी कारणांचा समावेश आहे. मदतीच्या रकमेसाठीही प्रतीक्षाचजातीय अत्याचाराचा बळी ठरलेल्या दलित, आदिवासी समाजातील व्यक्तीला शासनाच्या समाजकल्याण खात्याकडून मदतीची रक्कम दिली जाते. परंतु पोलीस व संबंधित यंत्रणेकडून वेळीच पाठपुरावा होत नसल्याने या मदतीच्या रकमेसाठीही अत्याचारग्रस्तांना वर्षोगणती प्रतीक्षा करावी लागते. प्रलंबित गुन्हे हे गृहखात्याचे अपयश मानले जाते.