शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

आगीची चौकशी करणार - मुख्यमंत्री

By admin | Updated: February 15, 2016 03:59 IST

सर्व प्रकारची दक्षता घेऊनही मेक इन इंडिया कार्यक्रमाच्या व्यासपीठाला आग का लागली याचा शोध घेण्यात येईल. याप्रकरणाची सक्षम अधिकाऱ्यांकडून वर्गाकडून चौकशी करण्यात येईल.

मुंबई : सर्व प्रकारची दक्षता घेऊनही मेक इन इंडिया कार्यक्रमाच्या व्यासपीठाला आग का लागली याचा शोध घेण्यात येईल. याप्रकरणाची सक्षम अधिकाऱ्यांकडून वर्गाकडून चौकशी करण्यात येईल. चौकशीनंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सांस्कृतिक कार्यक्रम सुरु असताना व्यासपीठाच्या समोरच्या भागात पहिल्यांदा आग लागली. या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. चार दिवसांपूर्वी या ठिकाणाचे फायर आॅडिट करण्यात आले होते. आपत्तीकालीन व्यवस्थापन आराखडा आम्ही तयार ठेवलेला होता. आगीचे कारण लगेचच सांगता येणार नाही. घटनास्थळी चार आगीचे बंब तैनात होते. आग लागल्यानंतर सोळा गाड्या दाखल झाल्या, असे फडणवीस यांनी सांगितले. सगळे कलावंत, नागरिक सुखरुप आहेत. लाकडे आणि व्यासपीठावरील पडद्यांनी आगीचे स्वरुप वाढले. एसओपी (स्टँडर्ड आॅपरेटिंग प्रोसिजर) मध्ये काही उणीवा होत्या का? हे देखील तपासले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ‘कलाकारांच्या सामानाचे जे काही नुकसान झाले असेल, ती भरपाई सरकारकडून दिली जाईल. कलावंतांनी त्यांच्या सामानाच्या नुकसानीची काळजी करु नये,’ असे आश्वासन उद्योगराज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी दिले. कार्यक्रमासाठी सुमारे दहा हजार पासेस देण्यात आले होते. तर ५ हजार सपोर्ट स्टाफ होता. तर हजारो लोक प्रेक्षक होते. सुरुवातील पोलिसांनी मेटल डिटेक्टर आणि बॅरिकेड्स हटवले. गरज नसल्यास मरिन ड्राईव्ह परिसरात येऊ नये, असे आवाहन सातत्याने आम्ही करत होतो, अशी माहिती पोलिसांचे प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी दिली.मी परफॉर्मन्स करुन मागे गेलो होतो आणि परत स्टेजवर येण्यासाठी तयार होऊन उभा होतो. यानंतर लावणीचा परफॉर्मन्स सुरु असताना आग लागली. सगळ््यात महत्त्वाची गोष्ट साऊंडवाल्यांनी केली, ती म्हणजे त्यांनी म्युझिक सिस्टीम तत्काळ बंद केली. मुंबई पोलीस व अग्निशमन दलाने खूप चांगले काम केले. आजूबाजूच्या गोष्टींची हानी झालेली नाही. - विवेक ओबेरॉय, कार्यक्रमाचा सूत्रसंचालक माझी जबाबदारी संपली३२ वर्षे काम करताना पहिल्यांदाच एवढी मोठी दुर्घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी मी स्टेजचे काम पूर्ण केले होते. आज ४.३० वाजता तांत्रिक बाबींची पाहणी केली होती. माझी टीम ६ वाजता स्टेज परिसरातून बाहेर पडली. स्टेज पूर्ण झाल्यानंतर माझी जबाबदारी संपली होती. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय आहे. शोभेची दारु येथे वापरण्यात आली होती, मात्र त्यामुळे एवढी आग लागू शकत नाही. - नितीन देसाई, कला दिग्दर्शकमेक इन इंडिया सप्ताहात गिरगाव येथे लागलेली आग ही फार दुर्दैवी होती. पोलिस आणि अग्निशमन दलाने तातडीने पावले उचलल्यामुळे सर्व मान्यवर, कलाकार आणि नागरिक सुखरूप आहेत. - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसकार्यक्रमात लावणी सादर झाल्यानंतर हा अपघात झाला. अग्निशमन दल घटनास्थळी वेळेत दाखल झाले. काही वेळातच इथली परिस्थिती नियंत्रणात आली. कोणीही जखमी झालेले नाही.- शायना एन.सी., भाजपा नेत्यालावणीनंतर गोविंदा पथकांचा डान्स होणार होता. त्यात आमचे प्रेमनगर स्पोटर््स क्लब, चुनाभट्टी येथील ५२ मुले स्टेज मागे होती. आम्ही तत्काळ स्टेजचा परिसर सोडला. पण आमच्या बॅगा, अन्य सामान, मोबाईल हे तेथेच राहिले. सामान तेथेच सोडून आम्ही जीव वाचवला. - अमृत कोठेकर, गोविंदा, प्रेमनगर स्पोटर््स क्लबलावणीनंतर माझ्या कलेचे सादरीकरण होते. मात्र लावणी सादर होत असतानाच आग लागली. घटनास्थळी तत्काळ अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. सर्वांना बाहेर काढण्यात आले. सर्वांनीच एकमेकांना मदत केली आणि सर्वजण सुखरुप बाहेर पडले.- श्रेयस तळपदे, अभिनेताआग दुर्दैवी होती. पण मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाने त्वरीत पावले उचलून ती आटोक्यात आणली. गर्दीचे चेंगराचेंगरीत रुपांतर होऊ नये, यासाठी दोन्ही दलांनी उत्तम कामगिरी बजावली.- आदित्य ठाकरे, अध्यक्ष, युवा सेना २५० ट्रॅफिक पोलीस हजर होते. आम्ही ३० मिनिटांत सगळी वाहतूक पूर्ववत केली. एक हजार वाहनांना चौपाटी परिसरातून वाट मोकळी करुन दिली. रुग्णवाहिका सज्ज होत्या, - मिलिंद भारंबे, सहआयुक्त, ट्रॅफिक पोलीस घटनेत कोणत्याही प्रकारची जिवित हानी झालेली नाही. डिझास्टर मॅनेमेंट उत्तम असल्यामुळे काही मिनिटांतच सगळ््यांना बाहेर काढण्यात आले. पोलीस, आणि अग्निशमन दलामध्ये उत्तम समन्वयामुळे अनुचित प्रकार घडला नाही. - डॉ. दीपक सावंत, सार्वजनिक आरोग्यमंत्रीप्रतिमा मलीन झालीआगीमुळे या सप्ताहाची प्रतिमा मलीन झाली आहे. सरकारने अपयशाची जबाबदारी स्वीकारावी. - नवाब मलिक, राष्ट्रवादीतीन मिनिटांनी माझा परफॉर्मन्स होता. मधेच पूजाचे गाणे थांबले. आधी आम्हाला वाटले की, टेक्निकल प्रॉब्लेम झाला आहे. नंतर शॉर्टसर्किट झाल्याचे स्पष्ट झाले. आधी वाटले आग थांबेल. पण, आग वाढतच गेली.- वैभव तत्त्ववादी, अभिनेता आॅपरेशन ग्रीन कॉरिडोअर : महाराष्ट्र रजनी कार्यक्रमापूर्वी मुंबई पोलिस, ट्रॅफिक पोलिसांनी मोठ्या प्रमाण मॉक ड्रिल केले होते. त्यामुळे दुर्घटना होऊनही चेंगराचेंगरी टाळता आली. वाहतूक पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका यांनी आॅपरेशन ग्रीन कॉरिडोअरचा सातत्याने सराव केला होता. पोलीस दल व क्राईम ब्रांचचे १ हजार जवान तैनात होते. पालिकेची तत्परतारात्री ८.२० वायरलेस संदेशाद्वारे बीएमसी कंट्रोल रुमला आग लागल्याची वर्दी ८.२२ वाजता अग्निशमन दलाने दोन नंबर वर्दीची आग असल्याचे कळवले.१४ फायर इंजिन, १० वॉटर टँकर, ८ जम्बो टँकर्स घटनास्थळी रवाना.डी विभाग नियंत्रण कक्ष, मंत्रालय, १२९८ तसेच १०८ रुग्णवाहिका सेवा, सैफी रुग्णालय, जे. जे. रुग्णालय, के. ई. एम. रुग्णालय आणि जे. टी. रुग्णालय यांना सतर्क आणि सज्ज राहण्याचा संदेश.डी विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास क्षीरसागर, परिमंडळ १ चे उपआयुक्त करवंदे यांनाही कळविण्यात आले. जिल्हाधिकारी ए. शैला यांनाही माहिती दिली.अग्निशमनच्या मागणीनुसार, इ. एम. एस. रुग्णवाहिकेला पाचारण इएमएसची १६ वाहने घटनास्थळी रवाना झाल्याचे डॉ. अमोल पंडित म्हणालेएनडीआरएफचे असिस्टंट कमांडंट नलावडे यांना रात्री ८.५४ वाजता माहिती दिली. एनडीआरएफचे दिल्ली विभागाचे तोमर यांनी मुंबई डिव्हीजनला सतर्क राहण्याचे आदेश द्या, असे सांगितले. त्यानुसार चोपडे, मुंबई एनडीआरएफ यांना कळविले.रात्री ९.०७ वाजता वायरलेस संदेशानुसार, चारही बाजूंनी आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे कळालेरात्री ९.४६ वाजता आग नियंत्रणात आली असल्याचे अग्निशमन दलाने कळवले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, आयुक्त अजय मेहता हे महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात रात्री ९.३५ वाजता दाखलआग आटोक्यात आल्याचा संदेश रात्री ९.५९ वाजता अग्नीशमन दलाकडून प्राप्तमुख्यमंत्र्यांसह अन्य अधिकारी रात्री १०.०६ वाजता माहिती घेऊन रवाना> मुख्यमंत्र्यांचे आपत्ती व्यवस्थापनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आग लागली, तेव्हा व्यासपीठाच्या समोर उपस्थित होते. जेव्हा आगीनेरौद्र रुप धारण केले तेव्हाही मुख्यमंत्री पूर्ण घटनेवर लक्ष ठेऊन सूचना करीत होते.आग पूर्ण आटोक्यात आल्यावर त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. कोणीही घटनास्थळाच्या आजूबाजूला राहता कामा नये, कोणी मागे राहिलेले नाही ना, याची काळजी घ्या, अशा सूचना ते वारंवार करत होते.काही लोकांना घटनास्थळावरुन बाहेर जाण्यासाठी देखील त्यांनी मदत केली. मुख्यमंत्री महापालिकेच्या कंट्रोल रुममध्ये गेले, तेथेही योग्य समन्वय राखण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.