मुंबई - ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे आणि टाटा मोटर्सचे जनरल मॅनेजर शंतनू नायडू यांच्या आगळ्यावेगळ्या मुलाखती आज, सोमवारी ठाण्यात रंगणार आहेत. निमित्त आहे, लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्याचे. मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि लोकमत मीडियाचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात मराठीतील विविध साहित्यप्रकारांत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या पुस्तकांचा व लेखकांचा सन्मान होणार आहे.
लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्याचे हे सहावे वर्ष आहे. आज, ३१ मार्च रोजी सायंकाळी ५:३० वाजता टिपटॉप प्लाझा येथे हा सोहळा आयोजित केला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेतलेल्या रंगनाथ पठारे यांच्या प्रदीर्घ साहित्यसेवेसाठी त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल. या निमित्ताने ख्यातनाम समाजसेवक प्रकाश आमटे यांची मुलाखत अभिनेत्री तेजश्री प्रधान घेणार आहेत. टाटा मोटर्स स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हचे सहव्यवस्थापक व 'मुंबई बुकीज' वाचन चळवळीचे प्रमुख शंतनू नायडू यांची मुलाखत हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असेल.
यावर्षीचे पुरस्कार विजेतेडॉ. प्रकाश आमटे (दस्तावेज / नवी पिढी, नव्या वाटा), समकालीन प्रकाशनचंद्रकांत कुलकर्णी (दस्तावेज / चंद्राकांत कुलकर्णी सादर करीत आहे...) राजहंस प्रकाशनमकरंद साठे (कादंबरी / त्रिविधा) पॉप्युलर प्रकाशनप्रसाद कुमठेकर (कथा/इत्तर गोष्टी) पपायरस प्रकाशनविकास पालवे (कविता/चकवा) काव्याग्रह प्रकाशनप्रगती पाटील (बालसाहित्य / त्रिकोणी साहस) साधना प्रकाशननितीन रिंढे (अनुवाद / द लायब्ररी) वॉल्डन प्रकाशनअनंत सोनवणे (लक्षणीय / एक होती माया) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पशैला मुकुंद (लक्षणीय / अभिषेकी) राजहंस प्रकाशनविकास गायतोंडे (मांडणी/वस्त्रगाथा) राजहंस प्रकाशनमिलिंद कडणे (मुखपृष्ठ / फैज अहमद फैज) लोकवाङ्मय प्रकाशन
कार्यक्रम सर्वांसाठी खुलापुस्तके सोहळ्याच्या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. विजेते पुरस्कार विजेत्या लेखकांची विजेती लेखक वाचकांना पुस्तकांवर स्वाक्षऱ्या देतील. हा वेगळा प्रयोग गेल्या दोन वर्षापासून ठाण्यात सुरू आहे. या निमित्ताने ठाण्यात २८ तारखेपासून साहित्य महोत्सवाचेही आयोजन केले असून, कोरम मॉलमध्ये पुस्तकांचे प्रदर्शनही भरलेले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठीखुला आहे.