शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलींचे अपहरण करून वेश्या व्यवसायासाठी विक्री करणारी आंतरराज्य टोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:43 IST

दिल्लीच्या एका महिलेने मीरारोड येथे विक्री केलेल्या 11 व 3 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींची पोलिसांनी सुटका केली आहे.

मीरारोड, दि. 13 - दिल्लीच्या एका महिलेने मीरारोड येथे विक्री केलेल्या 11 व 3 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींची पोलिसांनी सुटका केली आहे. सदर मुलींना भविष्यात वेश्याव्यवसायास लावण्या करीता खरेदी केल्याचे समोर आले असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. लहान मुलींचे अपहरण करून विक्री करणारी आंतरराज्य टोळी असल्याचे ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ महेश पाटील यांनी म्हटले आहे. 

एका संस्थेच्या माध्यमातून पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे सपोनि संजय बांगर यांनी पथकासह मीरा रोड च्या सृष्टी वसाहतीतील कल्पतरू इमारतीतील सदनिकेवर छापा टाकला. त्यावेळी तेथे अमृतसर येथून वर्षभरा आधी अपहरण करून आणलेली 11 वर्षांची मुलगी सापडली. पोलिसांनी या प्रकरणी गपचू उर्फ भाग्यकुमार प्रेमकुमार राज (49), त्याची बहीण दीपा (40) व प्रमोदकुमार राज (42) यांना अटक केली. चौकशीत सदर मुलगी प्रमोदकुमार सह गपचू चा भाऊ नंदू (38) यांच्या मध्यस्थीने दिल्लीच्या एका महिले कडून 1 लाख रुपयांना खरेदी केल्याचे समजले.  

दिल्ली च्या महिलेकडून आणखी एक 3 वर्षाची मुलगी 75 हजार रुपयांना खरेदी केल्याचे प्रमोदकुमार याने माहिती देताच पोलिसांनी शांती पार्क येथील सदनिकेतून त्या 3 वर्षांच्या मुलीची सुटका केली. तेथून पोलिसांनी नंदू सह पिंकी राज या दोघांना अटक केली आहे. 

अटक आरोपी मूळचे राजस्थानचे असून त्यांना  23 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. सदरची टोळी दिल्ली, राजस्थान, पंजाब , महाराष्ट्र , बंगळुरू आदी ठिकाणी कार्यरत असून आणखी मुलींची देखील खरेदी विक्री झाल्याची शक्यता डॉ पाटील यांनी वर्तवली आहे. 

सुत्रधार आरोपी महिलेचा शोध सुरू आहे.  अटक आरोपींची चौकशी केली जात असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत कदम यांनी सांगितले. अल्पवयीन मुली खरेदी करून त्यांना वेश्याव्यवसायासाठी लावून बक्कळ पैसे कमावण्याचा आरोपींचा गैरधंदा आहे. गपचूने स्वतः च्या मुलीस पण दुबई येथे वेश्यावसाय साठी पाठवल्याचे समोर आले आहे.