शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

International Yoga Day 2018 : शाळा-महाविद्यालयांत योगाचे धडे, विद्यार्थ्यांसाठी योग धोरण तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 02:03 IST

सध्या स्पर्धा असल्याने विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तो ताण सहन करून पुढे जाणे अनेकांना जमत नाही.

- श्रीकिशन काळेपुणे : सध्या स्पर्धा असल्याने विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तो ताण सहन करून पुढे जाणे अनेकांना जमत नाही. परंतु योग ताणावर नियंत्रण आणू शकते. त्यामुळे मन आणि शरीर निरोगी राहते. म्हणूनच आता शाळांमध्ये योग हा विषय सक्तीचा केला जाणार आहे. त्यासाठीचा अंतिम मसुदा तयार झाला आहे. तो मंगळवारी (दि.१९) उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच शाळा-महाविद्यालयात योगाचे धडे गिरवताना विद्यार्थी दिसणार आहेत. आता अंमलबजावणी कशी करायची, याबाबत समितीला विचार करावा लागणार आहे.योग ही आपली प्राचीन काळापासूनची एक निरोगी राहण्याची जीवनशैली आहे. आज शरीराला निरोगी ठेवण्यासाठी ही जीवनशैली उपयुक्त आहे. हीच जीवनशैली आता शाळा-महाविद्यालयात शिकवली जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक योग धोरण समिती स्थापन केली आहे. धोरणाचा अंतिम मसुदा तयार करण्यासाठी उपसमिती नियुक्त केली होती. त्यामध्ये राज्यातील योग संस्थांतील प्रमुख व्यक्तींचा सहभाग आहे.पुण्यातील योगतज्ज्ञ डॉ. पल्लवी कव्हाणे यांचा समितीमध्ये समावेश आहे. त्यांनी लोकमतशी बोलताना या विषयाची माहिती दिली. त्या म्हणाल्या, गेल्या काही वर्षांपासून योगाकडे लोकांचा कल वाढतो आहे. योगासनांच्या स्पर्धा असतात. त्यामुळे याकडे विद्यार्थ्यांचा ओढा होताच; पण आता मध्यमवर्गीय लोकांचादेखील कल वाढत आहे. कारण सध्या प्रत्येकाला काही तरी ताणतणाव आहेत. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक बनले आहे.योगामुळे शरीर व मन यावर ताबा राहतो. बालभारतीतर्फे शारीरिक शिक्षण या विषयातंर्गत योगाची आसने घेतात. पण तो व्यायाम म्हणून घेतली जातात. तसेच ते शिकवणारे शिक्षक योगाचे शिक्षण घेतलेले नसतात. त्यामुळे हा विषय दुर्लक्षित राहिला आहे. परंतु आता आम्ही शाळा आणि महाविद्यालयात शिकविण्यासाठी योग धोरण तयार केले आहे. ते शासनाकडे नुकतेच पाठविले आहे. केवळ आता त्याची अंमलबजावणी कशी करायची ते ठरविणे आवश्यक आहे. कारण मोठ्या प्रमाणावर योगशिक्षक उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे जे शारीरिक शिक्षणाचे धडे देतात, त्यांनाच योगाचा अभ्यासक्रम शिकवून तयार करण्याचा पर्याय दिला आहे. तसेच योग संस्थेत अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांनाही यामध्ये सहभागी करून घेता येईल. शासनाने यावर निर्णय घेणे अपेक्षित आहे.>अभ्यासक्रमात लेखीआणि प्रात्याक्षिक असणारशाळेतील विद्यार्थ्यांसाठी आम्ही आसनांची माहिती आणि वयानुसार अभ्यासक्रम तयार केला आहे. यात लेखी आणि प्रात्याक्षिक अशा दोन्ही प्रकारांचा समावेश आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पातंजल सूत्र आणि अधिक विस्तृत माहिती देणारा अभ्यासक्रम तयार केला आहे, असे पल्लवी कव्हाणे यांनी सांगितले. बालभारतीने तयार केलेल्या योगाच्या शिक्षणाचा आणि इतर साहित्याचा अभ्यास करून हे धोरण बनविल्याचेही त्यांनी सांगितले.>योग धोरणाचा अंतिम मसुदा माझ्याकडे आला आहे. त्याबाबत समितीचीबैठक घेऊन तो शासनाकडे सादर करणार आहोत. तसेच गुरूवारी होणारा जागतिक योग दिन महाविद्यालयात साजरा करावा, याची सूचना सर्व महाविद्यालयांना देण्यात आली आहे. - धनराज माने, उच्च शिक्षण संचालक व योग धोरण समिती सदस्य>धोरण अंमलबजावणीसाठी सूचनाशारीरिक शिक्षकांना योगाचे शिक्षण देऊन त्यांना पारंगत करावे.योग संस्थेतशिक्षण घेतलेल्यांना शिकविण्यासाठीनियुक्त करावेमहिन्यातून एकदा किंवा दोनदा योगतज्ज्ञांना गेस्ट लेक्चरर म्हणून बोलवावेसध्या मुलांमध्येच नाही तर मोठ्यांमध्येही तणाव वाढत आहे. त्यामुळे नैराश्य निर्माण होते आणि विचित्र निर्णय घेतले जातात. योगाने मन व शरीर चांगले राहते. त्यामुळे सध्या योगाकडे लोकांचाकल वाढत आहे.आज घराघरांत योग पोचला आहे. परंतु तो योग शिक्षकाकडूनचशिकला पाहिजे.- डॉ. पल्लवी कव्हाणे,सदस्य, योग धोरण समिती,महाराष्ट्र राज्य

टॅग्स :Yogaयोग