शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

International Yoga Day 2018 :‘कसरतीला’ जास्त पसंती, परंपरागत योगात कालानुरूप होताहेत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 02:01 IST

बदलती जीवनशैली, कामाचा वाढता ताण, स्पर्धात्मक काळात जगताना सातत्याने कराव्या लागणाऱ्या आव्हानांचा सामना यामुळे स्वत:च्या आरोग्याकडे सहजपणे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.

- युगंधर ताजणेपुणे : बदलती जीवनशैली, कामाचा वाढता ताण, स्पर्धात्मक काळात जगताना सातत्याने कराव्या लागणाऱ्या आव्हानांचा सामना यामुळे स्वत:च्या आरोग्याकडे सहजपणे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. जगाला योगाची अनमोल देणगी देणाºया भारत देशात आता झटपट परिणांसाठी ‘जिम’कडे तरुणाईचा कल वाढू लागल्याचे दिसून येत आहे. या सगळ्यात आपल्या देशातील योगाचे महत्त्व परदेशी देशांनी जाणून त्यांच्याकडे ‘योगा’ची दखल गांभीर्याने घेत असल्याचे योगाक्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.परंपरागत योगामध्ये आता परिस्थितीनुरूप बदल होत असून, आता पावर योगा, पिलँटिस योगा, असे प्रकार पुरुष व महिलांमध्ये लोकप्रिय होताना दिसत आहेत. सिनेमांतील अभिनेत्यांच्या सिक्स पॅकची तरुणांना पडलेली भुरळ, तसेच अभिनेत्रींच्या झिरो फिगरची क्रेझ तरुणींच्या डोक्यात घट्ट बसल्याने त्यांना योगाऐवजी जिम जास्त प्रभावी वाटते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जिममधून मिळणारा तत्काळ परिणाम जो योगांमधून तुलनेने उशिरा मिळतो, असे मत तरुणाईचे आहे. याविषयी योगा प्रशिक्षक सलमा हेब्बल यांना विचारले असता त्यांनी तरुणाईच्या बदलत्या फिटनेस आवडीविषयी सांगितले. ज्या वेळी आमच्याकडे तरुण फिटनेस टेÑनिंगसाठी येतात, तेव्हा आम्ही सुरुवातीच्या दिवसांत त्यांना योगाचे काही धडे देतो. यात श्वासावर नियंत्रण, सूर्यनमस्कार यावर भर दिला जातो. मात्र तरुणाईच्या ते पचनी पडत नाही. थोड्याच दिवसांत ते त्याला कंटाळतात आणि जिमकडे लक्ष केंद्रित करतात. काही करून आकर्षक शरीरयष्टी त्यांना कमावयाची असल्याने ते मेहनतीच्या कसरतीला तयार होतात. हल्ली कसरतीच्या जोडीला झुंबा, बॉलिवूड, एरोबिक्स यांचेही प्रमाण वाढल्याचे पाहावयास मिळते. योगातून मिळणाºया रिझल्टकरिता लागणारा संयम तरुण पिढीकडे नसल्याने त्यांची आवड जिमकडे जास्त आहे. योगामुळे एकाग्रता वाढते, श्वासावर नियंत्रण ठेवता येते. विविध आसनांमुळे शरीरांमध्ये एक प्रकारची लवचिकता येते. मन आनंदी, प्रसन्न राहण्यास मदत होते. मात्र या सगळ्यासाठी कमालीचे सातत्य व संयम असणे आवश्यक आहे. जो तरुणांमध्ये फार कमी प्रमाणात आहे.योगामध्ये तरुणाईची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांना आपल्याकडील प्रसिद्ध अय्यंगार योगा, विक्रम हॉट योगा, सद्यस्थितीला लोकप्रिय असलेले पावर योगा, पिलाटिस योगाचे धडे दिले जातात. ज्यात त्यांना सोपी आसने, त्याचे फायदे समजावून सांगितले जातात. तसेच त्या आसनामुळे आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणामदेखील सांगितला जातो. कमीत कमी वेळेतील आसने, त्याने शरीराला येणारी लवचिकता, मनाचा प्रफुल्लितपणा वाढण्यास मदत होते. सभोवतालच्या प्रदूषित वातावरणामुळे हदयाला स्वच्छ हवा मिळणे अवघड झाले आहे. याची परिणिती अस्थमा, श्वसनाचे विविध आजार, याशिवाय मणक्याचे आजारात होते. इन्स्टंट इफेक्टच्या सध्याच्या जमान्यात योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून, तरुणांंबरोबरच ज्येष्ठांकडून देखील कमी प्रमाणात योग प्रशिक्षणाला प्रतिसाद मिळत आहे.>तरु णींना हवे एरोबिक्स, झुंबा१५ ते २0 वयोगटातील मुली, याबरोबरच २५ ते ३५ च्या वयोगटातील तरुणी आणि महिलांना योगापेक्षा एरोबिक्स आणि झुंबासारख्या नृत्यप्रकारात जास्त रस आहे. त्यांना काही करून सुडौल दिसायचे आहे. झिरो फिगरचे आकर्षण आहे. इन्स्टंट रिझल्ट हवा आहे म्हणून ते योगाऐवजी शारीरिक कसरतीला प्राधान्य देतात. मात्र हे सगळे करत असताना सातत्याने डायट, त्याच्या वेळा, वेगवेगळी पथ्ये, याचे काटेकोरपणे पालन करावे लागते. योगा करताना आहाराचे कुठलेही बंधन नाही. त्यात सातत्याची गरज हवी असते. हीच गोष्ट महिलावर्गाच्या लक्षात येत नाही. फिटनेस जिममध्ये कसरत करणाºया महिला या प्रामुख्याने या नोकरदार गटातील असून वेळेची उपलब्धता त्यांच्याकडील मुख्य प्रश्न असल्याचे सलमा सांगतात.>दुबईमध्येयोगाची क्रेझज्या देशात योगशास्त्राचा जन्म झाला, त्याच देशात त्याबद्दल विविध विचारप्रवाह प्रचलित आहेत. पाश्चिमात्य देशात योगाचे प्रशिक्षण घेण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्याकडे वेळेचे कारण सांगून योगाकडे दुर्लक्ष केले जाते. तर परदेशात मोठ्या प्रमाणात योगाचे प्रशिक्षणवर्ग सुरू होत आहे. यात दुबई शहराचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. सकाळी-संध्याकाळी योगाच्या अ‍ॅडव्हान्स क्लासेसला प्रतिसाद मिळत आहे.

टॅग्स :Yogaयोग