शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय महिला धावपटूला चोरट्याचा खो, सुप्रसिद्ध गणेश टेकडी मंदिरात भाविकांसोबत चोरटेही शिरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 21:34 IST

आंतरराष्ट्रीय धावपटू चारूलता सुधीर बेहरे - नायगावकर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने बेमालूमपणे लंपास केले. सुप्रसिद्ध गणेश टेकडी मंदीरात रविवारी दुपारी ही चोरीची खळबळजनक घटना घडली.

नागपूर : आंतरराष्ट्रीय धावपटू चारूलता सुधीर बेहरे - नायगावकर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने बेमालूमपणे लंपास केले. सुप्रसिद्ध गणेश टेकडी मंदीरात रविवारी दुपारी ही चोरीची खळबळजनक घटना घडली. बेहरे नायगावकर यांना नागपूरच नव्हे तर मध्यभारतातील क्रीडा क्षेत्रात मानाचे स्थान आहे.संकष्टी चतुर्थीचे निमित्त साधून चारूलता आणि त्यांचे पती सुधीर आज दुपारी २ च्या सुमारास श्री टेकडी गणेश मंदीरात दर्शनाला गेले. तेथे दर्शन आॅटोपल्यानंतर चारुलता यांचा सहज गळ्यावर हात गेला. यावेळी त्यांना त्यांचे मंगळसूत्र दिसले नाही. त्यांनी ही बाब पतीला सांगितली. चुकून ते घरीच राहिले असावे, असा समज करून त्या त्यांच्या जयप्रकाश नगरातील गौरीसूत अपार्टमेंटमध्ये पोहोचल्या. त्यांनी आपल्या घरात शोधाशोध केली. मात्र, मंगळसूत्र दिसले नाही.संकष्टी चतुर्थी निमित्त आज श्री टेकडी गणेश मंदीरा भाविकांची प्रचंड गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत चोरट्याने चारुलता यांचे मंगळसूत्र लंपास केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्या सीताबर्डी ठाण्यात पोहचल्या. त्यांनी उपनिरीक्षक स्थूल यांच्याकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदविला. त्यानंतर लगेच चारूलता यांना घेऊन श्री गणेश टेकडी मंदीर गाठले. पोलिसांनी येथे सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, सीसीटीव्हीतून काही हाती लागले नाही.अनेकांची ठाण्यात धावचारुलता बेहरे-नायगावकर रेल्वेत सेवारत आहेत. त्यांचे १० ग्रामचे मंगळसूत्र चोरट्याने लंपास केल्याचे कळताच त्यांच्या अनेक सहका-यांनी सीताबर्डी ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला. चोरट्याचा शोध घेतला जात आहे.