शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गुळवेल तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी सक्रिय

By admin | Updated: January 14, 2017 00:50 IST

उंटास चारा घेण्याच्या नावाखाली गोळा केली जाते बहुगुणी गुळवेल.

संजय खांडेकर अकोला, दि. १३- आरोग्यासाठी बहुगुणी असलेली गुळवेल तस्करी करणारी राजस्थानची आंतरराज्यीय टोळी अकोल्यात काही महिन्यांपासून सक्रिय आहे. उंटास चारा घेण्याच्या नावाखाली नागरी आणि ग्रामीण भागातून गुळवेल गोळा करून आयुवैद औषधी कंपन्यांना त्याची विक्री करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.गत काही महिन्यांपासून अकोल्यातील नागरी वसाहतींमध्ये उंट सवारीच्या नावाखाली मुलांना फेरफटका मारून आणणारी मंडळी सर्वत्र दिसते. दहा-वीस रुपये घेऊन उंट सवारीची सेवा ही मंडळी देत असते. फेरफटका मारीत असताना या मंडळीची टेहळणी परिसरात सुरू असते. निंबाच्या किंवा जुन्या वृक्षावर कुठे गुळवेल दिसली की ही मंडळी उंटासाठी चारा घेऊ का, म्हणून विचारणा करते. गुळवेलचे महत्त्व नसणारे अनेक जण सहजपणे वेल तोडण्याची परवानगी देतात. गुळवेलची पाने उंटाला चारल्यानंतर वेलीच्या दांड्या घेऊन ही मंडळी त्यांच्या तांड्यावर येते. वास्तविक गुळवेलच्या पानापेक्षा त्या कांड्यांचीच या मंडळीला आवश्यकता असते. तांड्याजवळ गुळवेलचा मोठा-साठा करून तो वन औषधी करणार्‍या कंपनीला विकला जातो. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून बायपास मार्गावरील लोक पाहत आहेत. याची माहिती काही जागरूक नागरिकांनी लोकमतला दिली. राजस्थानी मंडळीच्या गुळवेल तस्करीमुळे अकोला परिसरातील बहुगुणी वनस्पती नष्ट होत असून याकडे कु णी गांभीर्याने पाहण्यास तयार नाही.- बायपास मार्गावर जवळपास चाळीस उंट आणि शेकडो महिला-पुरुषांचा तांडा दोन महिन्यांपासून वसला आहे. शहरातील आजूबाजूच्या नागरी वसाहतीतून ही मंडळी गुळवेल तोडून आणते. मोठा साठा झाला की ट्रक द्वारे हा साठा बाहेरगावी पाठविला जात असल्याचे आम्ही पाहत आहोत.- अजय जहागीरदार, नागरिक, बायपास मार्ग अकोला.लिव्हर टॉनिक गुळवेलमोठय़ा झाडांच्या मुळापासून तर फांद्यापर्यंत गुळवेल आपले जाळे विणत नेते. निंबाच्या झाडावर असलेली गुळवेल औषधी गुणधर्मात महत्त्वपूर्ण मानली जाते. लिव्हर टॉनिक म्हणून गुळवेलला आयुर्वेदात विशेष महत्त्व आहे. गुळवेलचे सत्त्व मोठमोठय़ा कंपन्या किलो ग्रामच्या भावाने विक्री करतात, अशी माहिती वनस्पती तज्ज्ञ संदीप वाघाळकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.