शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

डीएसकेंच्या मुलाला शरण येण्याचे निर्देश; अटकपूर्व जामीन देण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 01:29 IST

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणातील आरोपी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला.

मुंबई : ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणातील आरोपी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. उच्च न्यायालयाने शिरीष कुलकर्णी यांना अर्ज मागे घेण्याची सूचना करत शरण येण्यास सांगितले आहे.आपल्या परिवारातील अनेकांच्या नावावर डीएसकेंनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचे पुरावे पुणे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यात मुलगा शिरीष कुलकर्णी व सून तन्वी कुलकर्णी यांचाही समावेश आहे. अटकेपासून बचाव व्हावा, यासाठी शिरीष कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. या अर्जावरील सुनावणी न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे होती.शिरीष कुलकर्णी स्वत:ला डीएसकेंच्या ब्रँडपासून वेगळे ठेवू शकत नाहीत, असे म्हणत उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करणार नसल्याचे स्पष्ट केले. जामीन अर्ज फेटाळण्याऐवजी त्यांनी तो मागे घ्यावा आणि शरण यावे. शरण केव्हा जाणार याची माहिती ८ जूनपर्यंत द्यावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले. ठेवीदारांची फसवणूक करून आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी डीएसके व त्यांच्या पत्नीवर काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे.

टॅग्स :Courtन्यायालय