शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना तत्काळ १० हजारांची मदत

By admin | Updated: June 14, 2017 06:34 IST

कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांना बी-बियाणे खरेदीसाठी तातडीने १० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला.

- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांना बी-बियाणे खरेदीसाठी तातडीने १० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी याबाबतची मागणी मंत्रिमंडळ बैठकीत केली आणि ती लगेच मंजूर केली गेली. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अशी रोख मदत देण्याची मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती लगेच स्वीकारली. या निर्णयाबद्दल रावते यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. राज्य सरकारने याआधीच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. सरसकट कर्जमाफीचा तपशीलवार प्रस्ताव सादर करणे, निकष ठरवणे यासाठी काही काळ जाणार आहे. खरिपाच्या पेरणीयोग्य पाऊस झाल्याने बी-बियाणे खरेदीसाठी तातडीची मदत म्हणून शेतकऱ्यांना १० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही रक्कम नवे पीककर्ज देताना कापून घेण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारवर या रकमेचा बोजा पडणार नाही, असे रावते यांनी पत्रकारांना सांगितले.दौंडच्या आमदाराने कर्जमाफी नाकारली...आमदार, खासदारांनी कर्जमाफी घेऊ नये, या राज्य सरकारच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे जिल्ह्यातील दौंडचे आमदार राहुल कुल यांनी ‘मला कर्जमाफीतून वगळा’ असे विनंती पत्र आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले. राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या माफीचा लाभ धनदांडगे व उत्पन्नाचे इतर स्रोत असलेली मंडळी घेतील, अशी शंका उपस्थित करण्यात आली होती. त्यावर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अशा सधन मंडळींनी स्वत:हून कर्जमाफी नाकारावी, असे आवाहन केले होते. त्यानुसार आ. कुल यांनी कर्जमाफी नाकारली आहे.आपल्यावर २० लाख रुपयांचे कृषी कर्ज असून, ते फेडण्यास मी व माझे कुटुंबीय सक्षम आहोत, असे कुल यांनी या पत्रात म्हटले आहे. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.