नाशिक : आघाडी सरकारच्या काळातील जलसंपदा खात्यामधील गैरव्यवहाराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून योग्य दिशेने चौकशी सुरू असून, अधिकाऱ्यांना आवश्यक ती सर्व कागदपत्रे देण्यात आल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी येथे दिली.अवर सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडून चौकशी सुरू आहे. लवकरच त्याबाबत खुलासा केला जाईल, असे ते म्हणाले. सिंहस्थ कुंभमेळ््याच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की गृहमंत्री पदाबाबत दोन महिन्यांपासून चर्चा होत असली, तरी मी जलसंपदा खात्यातच रमलो आहे. जलसंपदाचे काम मोठे असून, त्यात मी समाधानी आहे.पंकजा मुंडे यांच्यावरील आरोपांबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले. मार्चअखेर असल्याने केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या दरानुसार महिला बालकल्याण खात्याने खरेदी केली. एप्रिलनंतर रेट आॅफ कॉन्ट्रॅक्ट बदलण्यात आलेले आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्याचा खुलासा केला आहे. गरज पडली तर चौकशी करण्याचीही तयारी दर्शविली आहे, असे त्यांनी सांगितले.
‘जलसंपदा’ची चौकशी योग्य दिशेने
By admin | Updated: July 1, 2015 01:18 IST