आरे कॉलनीत आढळला जखमी कोल्हा
By admin | Published: August 1, 2016 07:47 PM2016-08-01T19:47:05+5:302016-08-01T19:49:26+5:30
आरे मिल्क कॉलनीतील खडकपाडा परिसरात सोमवारी सकाळी कोल्हा जखमी अवस्थेत आढळला, वनविभागाच्या अधिका-यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी कोल्ह्याला ताब्यात घेतले आणि उपचारासाठी दाखल केले
Next
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 01 - आरे मिल्क कॉलनीतील खडकपाडा परिसरात सोमवारी सकाळी कोल्हा जखमी अवस्थेत आढळला. जखमी कोल्हा आढळल्यानंतर स्थानिकांनी आरे मिल्क कॉलनी प्रशासनाला याबाबत माहिती दिली. मात्र दोन तास उलटून गेल्यानंतरही त्यांच्याकडून काही मदत मिळाली नाही. शेवटी दोन तास वाट पाहिल्यानंतर स्थानिकांनी वनविभागाच्या अधिका-यांशी बातचीत करुन घटनेची माहिती दिली. वनविभागाच्या अधिका-यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी कोल्ह्याला ताब्यात घेतले आणि उपचारासाठी दाखल केले.