शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भोंग्यांबाबत मुस्लीम कौन्सिलचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 06:54 IST

मुंबई : राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका मांडली, तर भाजपच्या काही नेत्यांकडून हनुमान ...

मुंबई : राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका मांडली, तर भाजपच्या काही नेत्यांकडून हनुमान चालिसा म्हणण्यासाठी भोंगे वाटले जात असल्याने समाजात तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. ते रोखण्यासाठी महाराष्ट्र मुस्लिम कौन्सिलने पुढाकार घेतला आहे. 

त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने मशिदीवरील भोंग्यांवर बंदी घातली नसली तरी त्याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याबाबत मशिदीचे ट्रस्टी व धार्मिक नेत्यांच्या भेटी घेऊन त्याबाबत सूचना करण्यात येणार आहेत. राज्यात धार्मिक सोहार्दाचे वातावरण कायम राहावे आणि भोंगे हा राजकीय विषय बनू नये, यासाठी बोरीबंदर येथील अंजुमन इस्लाम शाळेतील ग्रंथालयात त्याबाबत नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये सध्या ज्या मशिदीवर लाऊडस्पीकर लावलेले आहेत, त्यासाठी पोलिसांची परवानगी आहे; मात्र त्याचा आवाज ठरावीक डेसिबल्समध्ये ठेवावा, त्याचा इतर कोणालाही त्रास होऊ नये यासाठी कौन्सिल प्रयत्नशील आहे.

राज्यात बंधुभावाचे वातावरण, कायदा व सुव्यवस्था राखणे हे सर्वांची जबाबदारी आहे. राजकीय फायद्यासाठी केवळ एका समाजाला लक्ष्य केले जाऊ नये. कायदा प्रत्येक समाजासाठी समान असला पाहिजे.- एम. ए. खालिद, सरचिटणीस, अखिल भारतीय मिली कौन्सिल ऑफ महाराष्ट्र 

टॅग्स :Muslimमुस्लीमRaj Thackerayराज ठाकरेMosqueमशिद