शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

ऐन थंडीत महागाईचे चटके! ८ दिवसांत फ्लॉवरचे दर दुप्पट, शेवगा शेंगेसह मिरचीही कडाडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 07:12 IST

आवक कमी झाल्यामुळे बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. एक आठवड्यापूर्वी फ्लॉवर ६ ते ८ रुपये किलो दराने विकला जात होता.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक घडली आहे. यामुळे ऐन थंडीमध्ये बाजारभाव वाढू लागले आहेत. होलसेल मार्केटमध्ये आठ दिवसांमध्ये फ्लॉवरचे दर दुप्पट वाढले असून शेवगा, शेंग, हिरवी मिरचीचे दरही कडाडले आहेत. बाजार समितीमध्ये हिवाळा सुरू झाल्यापासून भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत होती.  रोज ३ हजार टनपेक्षा जास्त आवक होत असल्यामुळे बाजारभाव वाढू लागले होते. परंतु सोमवारी ५६९ वाहनांमधून  २९०३ टन भाजीपाला विक्रीला आला आहे. यामध्ये ५ लाख ३५ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. राज्याच्या  विविध भागातून भाजीपाला विक्रीला येत आहे. वाटाणा मध्य प्रदेशमधून तर इतर काही वस्तूंची गुजरातमधून आवक होत आहे.

आवक कमी झाल्यामुळे बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. एक आठवड्यापूर्वी फ्लॉवर ६ ते ८ रुपये किलो दराने विकला जात होता. आता हेच दर १४ ते २० रुपयांवर गेले आहेत. शेवग्याची शेंग ६० ते ८० वरून ७० ते १२० रुपयांवर गेले आहेत. हिरव्या मिरचीचा ठसकाही वाढू लागला आहे. गेल्या सोमवारी २० ते २८ रुपये किलो दराने विकली जाणारी ज्वाला मिरचीचे दर ४० ते ५० रुपायांवर पोहचले आहेत. टोमॅटो, वाटाणा, घेवडा, काकडी व इतर भाजीपाल्यांचे दरही वाढले आहेत. आवक कमी झाली असून मागणी वाढल्यामुळे दरामध्ये फरक पडला असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. 

हिरव्या मिरचीचा ठसकाही वाढलाहिरव्या मिरचीचा ठसकाही वाढू लागला आहे. गेल्या सोमवारी २० ते २८ रुपये किलो दराने विकली जाणारी ज्वाला मिरचीचे दर ४० ते ५० रुपायांवर पोहचले आहेत. 

एपीएमसीमधील प्रतिकिलो दर भाजी    ९ जानेवारी    १६ जानेवारी फरसबी    १५ ते २५    २५ ते ४५फ्लॉवर    ६ ते ८    १४ ते २० घेवडा    ३० ते ३६    ४० ते ६०काकडी    १५ ते २२    १६ ते २४ढोबळी मिरची    २० ते २८    २० ते ४०शेवगा शेंग    ६० ते ८०    ७० ते १२०टोमॅटो    ७ ते १०    १० ते १८वाटाणा    १८ ते २६    २६ ते ३०वांगी    १८ ते २४    २० ते ४०भेंडी    २५ ते ५०    ३० ते ५२