शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आमदार, खासदारांची प्रभागात घुसखोरी

By admin | Updated: July 11, 2017 02:38 IST

नगरसेवकांच्या कार्यक्षेत्रात आमदार आणि खासदारांनी परस्पर कार्यक्रम आणि योजना राबविण्याच्या मुद्द्यावरून दहिसरमध्ये शिवसेना आणि भाजपात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे

मनोहर कुंभेजकर। लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नगरसेवकांच्या कार्यक्षेत्रात आमदार आणि खासदारांनी परस्पर कार्यक्रम आणि योजना राबविण्याच्या मुद्द्यावरून दहिसरमध्ये शिवसेना आणि भाजपात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. महापालिकेच्या आर मध्य आणि आर-उत्तरच्या प्रभागात समिती अध्यक्ष आणि वॉर्ड क्रमांक ७मधील शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी आपल्या प्रभागात भाजपा आमदार व खासदार परस्पर कार्यक्रम ठरवित आहेत. स्थानिक नगरसेवकांना विश्वासात न घेता महापालिका अधिकाऱ्यांसोबत कार्यक्रम ठरविले जात असल्याबद्दल तक्रार केली आहे. आमदार, खासदारांची ही घुसखोरी राजशिष्टाचाराला धरून नसल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे. आमदार व खासदारांकडून प्रभागातील कामांमध्ये होणाऱ्या घुसखोरीचा तीव्र निषेध करत म्हात्रे यांनी राजशिष्टाचाराचाच मुद्दा उपस्थित केला आहे. आमदार, खासदारांना पालिकेचीच कामे करायची असतील तर नगरसेवकांचा उपयोग काय, असा सवाल करतानाच हा मुद्दा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित करणार असल्याचे शीतल म्हात्रे यांनी सांगितले. शिवाय, स्थानिक नगरसेवकांना कल्पना दिल्याशिवाय सहायक आयुक्त आणि अन्य अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रभागात आमदार, खासदारांसोबत जाऊ नये, असे आवाहनही म्हात्रे यांनी आर-उत्तरच्या सहायक पालिका आयुक्त संध्या नांदेडकर यांना केले आहे.>कलगीतुरा रंगलाजर आमदार, खासदार प्रभागात भेटी देणार असतील तर स्थानिक नगरसेवकाला याची पूर्वकल्पना दिली गेली पाहिजे. परस्पर कार्यक्रम घेणे राजशिष्टाचाराला धरून नाही. प्रभाग समितीच्या बैठकीतही पालिकेचे अधिकारी आमदार, खासदारांसाठी पायघड्या घालत असतात. परंतु नगरसेवकांची कामे वेळेवर केली जात नाहीत. याबाबत सर्वच नगरसेवकांनी आपला संताप व्यक्त केल्याचे शीतल म्हात्रे यांनी सांगितले. दहिसरच्या भाजपा आमदार मनीषा चौधरी या शिवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये घुसखोरी करतात, दहिसर नदीचा विकास करण्याच्या मुद्द्यावरून आमदार चौधरी आणि प्रभाग समिती अध्यक्ष यांच्यात कलगीतुरा रंगल्याची चर्चा विभागात पाहायला मिळते.