शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
4
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
5
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
6
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
7
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
8
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
9
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
10
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
11
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
12
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
13
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
15
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
16
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
17
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
18
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
19
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
20
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   

फायद्याच्या शेतीसाठी उद्योगजगताने पुढाकार घ्यावा

By admin | Updated: June 27, 2017 02:05 IST

कृषीकर्ज माफ करणे हे शेतीविषयक समस्यांवरील उत्तर नसून, शेती फायद्याची व्हावी यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कृषीकर्ज माफ करणे हे शेतीविषयक समस्यांवरील उत्तर नसून, शेती फायद्याची व्हावी यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी उद्योगजगताने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे, असे आवाहन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सोमवारी केले.महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर आयोजित व्याख्यानात डॉ. मोहन भागवत बोलत होते. ते म्हणाले, समाज सक्षम करण्यासाठी उद्योग-व्यापार आणि कृषी या क्षेत्रांना एकत्रितपणे काम करावे लागेल; कारण ही क्षेत्र परस्पर पूरक आहेत.भारतीय उद्योग-व्यापार जगत हे जगभरात त्याच्या अव्वल विश्वासार्हतेबद्दल प्रसिद्ध आहे. कारण भारतीय माणूस कधीही केवळ पैशाचा विचार करीत नाही, तो समग्र समाजाच्या कल्याणाचा विचार करतो. हीच भारतीय संस्कृती आहे, असे सांगून ते म्हणाले, समाजवादी व्यवस्थेत उद्योगाचे नुकसान करून श्रमिकांच्या फायद्याचा विचार होतो, तर भांडवलदार पाश्चात्य व्यवस्थेत श्रमिकांचे नुकसान करून उद्योगांच्या फायद्याचा विचार केला जातो. भारतीय संस्कृतीत मात्र, या दोन्ही घटकांबरोबरच सर्व समाजाच्या कल्याणाचा विचार आहे. यावेळी मंचावर महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे आजी-माजी पदाधिकारी आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे उपस्थित होते.