शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

इंद्राणी, रायवर आरोपपत्र

By admin | Updated: November 20, 2015 03:59 IST

शीना बोरा हत्याप्रकरणी सीबीआयने शीनाची आई इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामवर राय यांच्यावर गुरुवारी दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

मुंबई : शीना बोरा हत्याप्रकरणी सीबीआयने शीनाची आई इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामवर राय यांच्यावर गुरुवारी दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. मात्र, शीनाची हत्या करण्यामागे या तिघांचा हेतू काय होता? याचा शोध लावण्यास सीबीआयला अद्याप यश मिळालेले नाही. २४वर्षीय शीनाची हत्या तिची आई इंद्राणी आणि तिचा दुसरा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामवर राय यांनी केल्याचा आरोप आहे. एप्रिल २०१२मध्ये शीनाची हत्या करून पेणच्या गागोदे गावाजवळील जंगलात तिचा मृतदेह असलेली बॅग जाळण्यात आली होती. या तिघांवर दाखल करण्यात आलेले आरोपपत्र एक हजार पानांचे आहे, तर १५० साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. साक्षीदारांमध्ये पीटर मुखर्जी यांचा मुलगा व शीनाचा प्रियकर राहुल मुखर्जी याचाही जबाब नोंदविण्यात आला आहे, हे वाक्य टाकण्यात आले आहे, तसेच ७ लोकांच्या सीआरपीसी कलम १६४ अंतर्गत दिलेल्या जबानीदेखील आरोपपत्राला जोडण्यात आल्या आहेत, तसेच डीएनए टेस्ट, कॉल डाटा रेकॉर्ड, एम्सने दिलेला वैद्यकीय अहवाल आणि शीनाची हत्या करण्यात आल्यानंतर इंद्राणीने तिच्या एका कर्मचाऱ्याला शीनाच्या नावे पाठवण्यास सांगितलेल्या ई-मेलच्या कॉपीची प्रतही आरोपपत्रांना जोडण्यात आली आहे. तिघांवरील आरोप सिद्ध करण्यासाठी सीबीआयने सुमारे २०० पुरावे आरोपपत्राला जोडले आहेत, परंतु या हत्येमागे तिघांचाही हेतू काय होता? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, हेसुद्धा सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे.इंद्राणी, खन्ना आणि राय यांच्यावर हत्या, हत्येचा कट रचणे, फसवणूक करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे, पुरावे नष्ट करणे इत्यादी आरोप ठेवण्यात आले आहेत, तर आयटी अ‍ॅक्टअंतर्गतही त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत.या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे होता. मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी या प्रकरणाचा तपास स्वत: लक्ष घालून केला होता. मात्र, या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शंका सरकारला आल्याने, हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. इंद्राणी, खन्ना आणि राय हे सध्या न्यायालयीन कोठडीत असून, शुक्रवारी त्यांची न्यायालयीन कोठडी संपत आहे. इंद्राणी आणि खन्ना बराच वेळ फोनवर बोलत होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी खन्ना मुंबईत आला आणि हॉटेलमध्ये मुक्काम केला. संध्याकाळी ७ वाजता इंद्राणी आणि खन्ना शीनाला आणण्यासाठी वांद्रे येथे गेले, असे राय याने कबुलीजबाबात म्हटले आहे.शीनाला रायगडला नेणे, ते तिची फास लावून हत्या करण्यापर्यंतच्या घडामोडी राय नीट देऊ शकलेला नाही. खन्नानेच शीनाच्या गळ्याला फास लावला आणि इंद्राणीच्या मदतीने शीनाचा मृतदेह बॅगमध्ये भरला. कारच्या डिक्कीत शीनाचा मृतदेह ठेवण्यात आला. त्यानंतर गागोदेच्या जंगलात त्या बॅगवर पेट्रोल टाकून बॅग पूर्ण जळेपर्यंत इंद्राणी व खन्ना तेथेच उभे होते, असेही रायने कबुली जबाबात म्हटले आहे. श्याम राय बनणार माफीचा साक्षीदार?इंद्राणीचा ड्रायव्हर श्यामवर राय याने गेल्याच आठवड्यात गुन्ह्यांची कबुली दंडाधिकाऱ्यांना दिली. त्याच्या कबुलीजबाबामुळे इंद्राणी आणि तिचा दुसरा पती संजीव खन्ना अडचणीत आला आहे. राय याने कबुलीजबाब दिल्याने सीबीआय त्याला या केसमध्ये ‘माफीचा साक्षीदार’ करू शकते. मात्र, अद्याप तरी सीबीआयने याबाबत निर्णय घेतला नसल्याचे, दिल्लीच्या एका सीबीआय अधिकाऱ्याने स्पष्ट केले. विशेष सीबीआय न्यायालय यावर निर्णय घेऊ शकेल, असेही सूत्रांनी सांगितले.शीना बोराच्या हत्येचा कट इंद्राणी मुखर्जीने रचला, तर तिचा दुसरा पती संजीव खन्ना याने तो कट अंमलात आणला, असे रायने दंडाधिकाऱ्यांना दिलेल्या कबुलीजबाबात म्हटले आहे.रायने गेल्याच आठवड्यात दंडाधिकाऱ्यांना पत्र लिहून, आपल्याला या केसची खरी माहिती द्यायची असल्याचे सांगितले. २७ आॅक्टोबर रोजी विशेष सीबीआय न्यायालयाने त्याचा कबुलीजबाब नोंदवण्यास नकार दिला. मात्र, ८ नोव्हेंबर रोजी त्याचा कबुलीजबाब नोंदवण्यात आला. सीबीआयने हा कबुलीजबाब आरोपपत्राला जोडला आहे.राय ७.६५ एमएम पिस्तूल घेऊन निघाल्याची माहिती पोलिसांच्या खबरीने दिल्याने, खार पोलिसांना त्याला अटक केली. या केसमध्ये त्याची चौकशी करत असताना, रायने शीना बोरा हत्येचे गुपित पोलिसांपुढे फोेडले. रायने दंडाधिकाऱ्यांपुढे दिलेल्या कबुलीजबाबानुसार, इंद्राणीने २३ एप्र्रिल २०१२ रोजी म्हणजेच, शीनाची हत्या करण्याच्या आदल्या दिवशी पेणजवळील गागोदे गावाची रेकी करण्यास पाठवल्याचे सांगितले.