शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत ब-याच घडामोडी घडतील, राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावर सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 19:39 IST

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपाने स्वीकारले नसल्याने त्यांना नवीन पक्ष काढावा लागला आहे. मात्र आता त्यांना मंत्रिपदाचे आश्वासन दिले असले तरी मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत ब-याच घडामोडी घडतील, असे संकेत राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपाने स्वीकारले नसल्याने त्यांना नवीन पक्ष काढावा लागला आहे. मात्र आता त्यांना मंत्रिपदाचे आश्वासन दिले असले तरी मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत ब-याच घडामोडी घडतील, असे संकेत राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. आमच्या पक्षप्रमुखांवर राणेंनी टीका केली तर ती सहन करणार नाही, असा इशाराही मंत्री केसरकर यांनी दिला. ते सावंतवाडी येथे बोलत होते.यावेळी शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघप्रमुख विक्रांत सावंत, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, विधानसभा संपर्कप्रमुख प्रकाश परब, अशोक दळवी, माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे, बाळू माळकर आदी उपस्थित होते. मंत्री केसरकर म्हणाले, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपाने स्वीकारले नाही. भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे. त्यामुळे राणेंची पार्श्वभूमी पाहून तो त्यांना स्वीकारणार नव्हते. आता नवीन पक्ष काढला आहे. मात्र नवीन पक्षाला एनडीएमध्ये घेत असताना त्यांची व त्यांच्यासोबत असलेल्यांची पार्श्वभूमी तपासावी. अनेकांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. मग हे नेते भाजपाला चालतील का? याचाही विचार करावा. जेव्हा आपण भ्रष्टाचारमुक्त भारत असा नारा देतो तेव्हा भ्रष्टाचार करणा-या व ज्यांच्या चौकशी सुरू आहेत अशांना पक्षात घेणार का? हेही बघितले पाहिजे.काम कमी, जाहिरात जास्तराणे हे मंत्री असताना सिंधुदुर्गचा विकास झाला नाही, त्यापेक्षा अधिक विकास आमच्या काळात झाला आहे. मोठ्या प्रमाणात निधी जिल्ह्यात आणला आहे. विकास प्रगतिपथावर आहे. उलट राणे यांनी मुख्यमंत्री असताना काय काम केले ते त्यांनी जाहीर करावे. राणे हे काम करतात कमी आणि जाहिरात जास्त करतात, अशी टीकाही यावेळी मंत्री केसरकर यांनी केली. राणे यांनी स्वतंत्र पक्ष काढला तो चालवावा, पण त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करू नये. अन्यथा आम्हाला त्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.दहशतीने ग्रामपंचायती आपल्याकडे घेण्याचा प्रयत्नसावंतवाडी तालुक्यात आम्ही एकाच ग्रामपंचायतीत अर्ज सादर केले नाहीत, तर काही ठिकाणी गाव पॅनेल असल्याने त्यांना समर्थन दिले. पण आता काहींनी दहशतीच्या जोरावर गाव पॅनेल असलेल्या ग्रामपंचायती आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे. गाव पॅनेल निवडून आले त्यातील अनेकांनी मला फोन करून आमचे गाव पॅनेल असून, तुमच्याकडे विकासकामासाठी केव्हाही येऊ शकतो, असे सांगितले आहे. मी सर्वांना विकासासाठी मदत करणार आहे. असे सांगत गाव पातळीवरच्या राजकारणात मी कुठेही हस्तक्षेप करणार नसल्याचेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर