शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
4
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
5
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
6
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
7
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
9
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
10
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
11
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
12
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
13
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
14
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
15
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
16
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
17
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
18
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
20
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?

विश्वगुरू होण्याकडे भारताची वाटचाल - राज्यपाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 03:42 IST

देश पुन्हा एकदा आपल्या शक्तीच्या जोरावर विश्वगुरू होण्याकडे वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले

मुंबई : बल, बुद्धी आणि विद्येच्या आधारे भारत निरंतरपणे विकास करत आहे. भारतात पूर्वीपासून विश्वगुरू कार्यरत होते. देश पुन्हा एकदा आपल्या शक्तीच्या जोरावर विश्वगुरू होण्याकडे वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी येथे केले.भारत जैन महामंडळाने बिर्ला मातोश्री सभागृहात आयोजित केलेल्या ‘विश्व मैत्री दिवस : क्षमापन’ समारोहात ते बोलत होते. या वेळी आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एम.के. जैन, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश के.के. तातेड, बँक आॅफ बडोदाचे कार्यकारी संचालक एस.एल. जैन, मुनिश्री प्रमुख सागरजी, महासती कंचनकंवरजी, साध्वी कैलाशवतीजी आदी उपस्थित होते. राज्यपाल कोश्यारी म्हणाले, भारतामध्ये अनेक प्रकारचे धर्म, जाती, पंथ आहेत. पण भारतीय म्हणून विचार केल्यास सर्व भेद विसरून हा सारा समाज भारतीय होऊन जातो. अनेक ऋषी, मुनी, महात्मे यांच्या कठोर तपस्येमुळे देशाची निरंतरपणे प्रगती होत आहे. देशात आर्यकाळापासून ज्ञानाची प्रथा चालत आलेली आहे. समाजातील अनेक धर्मांचे लोक विविध देशांतून शिक्षण घेत असून या माध्यमातून ज्ञान प्राप्त करत आहेत. हे ज्ञान आता पूर्ण विश्वात पसरत आहे. सूर्य जसा जाती-पाती, धर्म, वंश न मानता सर्वांना समान प्रकाश देतो त्याचप्रकारे देशात जाती-पाती उच्च-नीच न मानता सर्व समान आहेत. क्षमा हे वीर माणसाचे भूषण असून समाजातील प्रत्येक व्यक्तीने वीर बना, असेही त्यांनी या वेळी सांगितले. ऋषी, मुनींचा आशीर्वाद आणि उच्च आदर्शामुळे देश सशक्त व समर्थ बनेल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.या वेळी मोतीलाल ओसवाल व देवेंद्र भाई यांचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.जैन संघ रथयात्रेला सुरुवातपर्युषण पर्वानिमित्त दक्षिण मुंबई येथे आयोजित जैन संघ रथयात्रेस आज राज्यपालांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला. मुंबई जैन संघटनेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास जैन संघांचे साधू-साध्वी, नागरिक या वेळी उपस्थित होते. मुंबईत पहिल्यांदाच या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील जैन समाजातील सर्व समूहांच्या गुरूंनी एकत्र येऊन समाजाला एकतेचा संदेश दिला. पर्युषणपर्वानिमित्त शुभेच्छा देताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले, केवळ रूपवान, धनवान, बलवान असणे पुरेसे नाही, तर मनुष्याने क्षमावान असणे महत्त्वाचे आहे. या रथयात्रेच्या माध्यमातून मुंबईतील जैन बांधवांचा मोठा महासागर पाहावयास मिळाल्याचेही राज्यपाल म्हणाले.