शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

भारताचा जीडीपीचा दर चीनपेक्षा कमी

By admin | Updated: May 31, 2017 19:56 IST

चालू आर्थिक वर्षात भारताच्या जीडीपीचा दर घसरला आहे. आर्थिक वर्ष 2017मध्ये जीडीपीचा दर 7.1 टक्के होता. हा दर घसरून आता 6.1 टक्के इतका झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31- गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा परिणाम यंदाच्या जीडीपीवर झाला आहे. नोटाबंदीच्या परिणामांमुळे भारताचा विकासदर ७.१ टक्क्यांपर्यंत मंदावला, असा अहवाल केंद्रीय सांख्यिकी विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आला आहे. यापूर्वी जानेवारी- मार्च या शेवटच्या तिमाहीमध्ये नोटाबंदीचे नकारात्मक परिणाम दिसून आले होते. त्यामुळे भारताचा जीडीपी ६.१ टक्क्यांपर्यंत सिमीत राहिला होता. गेल्यावर्षी चांगला पाऊस पडल्याने कृषी क्षेत्रात चांगली वाढ दिसून आली होती. मात्र, 9 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यामुळे या सगळ्यावर पाणी फेरले गेल्यासारखी स्थिती आहे, असे सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे. घटलेल्या जीडीपीमुळे भारताने "वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था" हे शिर्षक गमावलं आहे. भारताचा जीडीपी आता चीनच्या जीडीपीपेक्षा कमी झाला आहे. जानेवारी-मार्च या तीन महिन्यात चीनचा जीडीपी 6.9 टक्के इतका आहे.  याआधी 2015-16 आणि 2016-17 या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी दर अनुक्रमे 8.3 टक्के आणि 7.6 टक्के इतका होता.  
केंद्रीय सांख्यिकी विभागातर्फे  बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या जीडीपीच्या आकड्यांमुळे मोदी सरकारने लोकांचा अपेक्षा भंग केल्याचं बोललं जातं आहे.  अर्थ तज्ज्ञांच्या मते, मोदींनी काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा परिणाम जीडीपीवर झाला आहे.  आज जाहिर झालेली तिमाही माहिती निराशाजनक आहे तसंच नोटाबंदीचे अर्थव्यवस्थेवर झालेले वाईट परिणाम दाखवणारी आहे, असं मत बँकिंग तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 
तिमाहीच्या जाहीर आकडेवारीनुसार शेती, वनीकरण आणि मासेमारी सेक्टरमध्ये 5.2 टक्के वाढ झाली आहे. खाण आणि उत्खनन क्षेत्रात 6.4 टक्के, उत्पादन क्षेत्रात 5.3 टक्के, वीज, गॅस, पाणी पुरवठा आणि इतर सेवा क्षेत्रात 6.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे. व्यापार, हॉटेल, वाहतूक आणि दळणवळण क्षेत्रात 6.5 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. आर्थिक, रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवा क्षेत्रात 2.2 टक्के वाढ झाली आहे तर सार्वजनिक प्रशासन, संरक्षण सेक्टरमध्ये 17 टक्के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे बांधकाम क्षेत्रात 3.7 टक्क्यांची घसरण झाली आहे.