शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतरमध्ये काश्मीरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हटला...
2
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
3
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
4
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
6
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
7
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
8
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
9
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
10
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
11
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
13
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
14
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
15
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
16
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
17
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
18
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
19
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
20
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान

कॉल सेंटरमधील फसवणुकीमुळे अमेरिकेत भारताची बदनामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2016 05:54 IST

अमेरिकेत कॉल करून फसवणूक तसेच खंडणी उकळणाऱ्या मीरा रोड येथील कॉल सेंटरवर छापे घालून ठाणे पोलिसांनी सील ठोकलेल्या

ठाणे : अमेरिकेत कॉल करून फसवणूक तसेच खंडणी उकळणाऱ्या मीरा रोड येथील कॉल सेंटरवर छापे घालून ठाणे पोलिसांनी सील ठोकलेल्या सात कॉल सेंटरमधील कारवायांनी परदेशात भारताची बदनामी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.मीरा रोडमधील डेल्टा टॉवरच्या सातव्या मजल्यावर वेगवेगळ्या लोकांकडून कॉल सेंटर चालविले जात होते. येथील प्रशिक्षित कर्मचारी अमेरिकन नागरिकांना फोन करून विमा पॉलिसी विक्री तसेच सरेंडर करून रक्कम परत देण्याचे आमिष दाखवत रकमा गोळा करीत होते. तसेच परदेशी ग्राहकांच्या बँक खात्यांची माहिती मिळवून पैसे लंपास करीत असत. काहींच्या खात्यावरून तर आॅनलाइन शॉपिंगही केली जात होती. अनेक कॉल सेंटरवरून कर गोळा करण्याची धमकी देत रकमेची वसुलीही केली जायची. या कॉलसेंटरमधून अमेरिकन नागरिकांना व्हीओआयपी (व्हॉइस ओवर इंटरनेट पोर्टल)वरून कॉल केला जायचा. अमेरिकन इंटर्नल रेव्हेन्यू आॅफिसर असल्याची बतावणी करीत अनेकांना कर चुकविल्याचे सांगत खटला दाखल करण्याचीही धमकी दिली जायची. दंडापोटी १० हजार डॉलर्सची मागणी करून नंतर कमी रकमेवर तडजोड करून रक्कम टार्गेट गिफ्ट कार्डद्वारे वसूल करण्याचा सपाटा या सेंटरमधून सुरू होता. (प्रतिनिधी)

कोट्यवधींची फसवणूक-मीरा रोड येथील कॉल सेंटरवरून सुमारे सात हजार परदेशी नागरिकांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असले तरी हा आकडा काही लाखांमध्ये असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. फसवणुकीतून या टोळ्यांनी लुटलेली रक्कम कोट्यवधींंच्या घरात आहे.फसवणूक आणि सदोष मनुष्यवधही-मीरा रोड येथील अशाच एका कॉलमुळे एक वयोवृद्ध महिला चांगलीच धास्तावली. तिलाही या तोतया अधिकाऱ्याने छापा टाकण्याची धमकी दिली होती. या कॉलचा धसका घेतल्याने तिचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहितीही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली आहे. आता ही महिला कोण आणि तिला कॉल करणारा तो ‘महाभाग’ कोण, याचीही पडताळणी केली जात आहे. यात तथ्य आढळल्यास संबंधित कॉल करणाऱ्यावर आयटी अ‍ॅक्ट, फसवणुकीच्या कलमांसह सदोष मनुष्यवधाचाही गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अनिवासी भारतीयांची प्रतिमा मलिनसातत्याने भारतातून येणाऱ्या कॉलची अमेरिकनांना सवयच झाली होती.काही चलाख अमेरिकन नागरिकांनी शब्दोच्चारावरून हे कॉल भारतातूनच येत असल्याचे ताडले होते. असे कॉल येताच त्यांना ते ‘यू फ्रॉड इंडियन’, ‘डोन्ट कॉल मी अगेन’ अशा भाषेत सुनावून ते फोन कट करीत होते. त्यामुळे अमेरिकेतील अनिवासी भारतीयांनाही तेथील स्थानिक त्याच नजरेने पाहू लागले होते.