शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भारतीय युवक इसिसमध्ये

By admin | Updated: April 24, 2015 01:02 IST

इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी गेल्या वर्षी कल्याणमधून इराकला गेलेल्यांपैकी एक तरुण इसिसमध्ये आत्मघातकी बॉम्ब बनला असावा असा संशय आहे

डिप्पी वांकाणी, मुंबईइसिसमध्ये सहभागी होण्यासाठी गेल्या वर्षी कल्याणमधून इराकला गेलेल्यांपैकी एक तरुण इसिसमध्ये आत्मघातकी बॉम्ब बनला असावा असा संशय आहे. या माणसाची ओळख शोधण्यासाठी इतर सुरक्षा संघटनांचीही मदत घेण्याचा एनआयएचा विचार आहे. टिष्ट्वटरवरील, मॅग्नेटगॅस १७ या हँडलवर उपलब्ध झालेल्या माहितीवरून हा संशय निर्माण झाला आहे. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) व आयबी या दोन्ही संघटनांच्या अधिकाऱ्यांचे या हँडलवर बारीक लक्ष आहे. कारण त्यावर २० एप्रिल रोजी अबू तौहीद अल हिंदी नावाने चेहरा झाकलेल्या माणसाचे छायाचित्र पडले होते. या माणसाच्या हातात एके-४७ रायफल होती व त्याने आपण खलिफाच्या भूमीत आहोत असे म्हटले होते. या व्यक्तीची रायफल आकाशाकडे रोखलेल्या स्थितीतील सहा छायाचित्रे टिष्ट्वटर हँडलवर पडलेली होती. एनआयएमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, या छायाचित्राखाली दोन ओळींचा मजकूरही होता. या मजकुरात असे लिहिले होते की, अबू तौहीद अल हिंदी आता खलिफाच्या भूमीत आहे. भारतातून अगदी कमी लोक इसिसमध्ये सहभागी झाले आहेत. आम्ही मरण्यास तयार आहोत. गुप्तचर खात्यातील वरिष्ठ सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अल हिंदी हे नाव इसिसमध्ये जाणाऱ्या भारतीय युवकांना देण्यात आले असावे. खलिफाच्या भूमीत म्हणजेच इसिसचा प्रमुख नेता अबू बक्र अल बगदादी याच्या जवळपास ते राहत असावेत. म्हणजेच त्यांनी प्रशिक्षणाचे अत्याधुनिक ज्ञान प्राप्त केले असावे. आत्मघातकी बॉम्ब बनेपर्यंत ज्यांचे प्रशिक्षण पूर्ण होते, तेच ‘खलिफाच्या भूमीत’ असा शब्दप्रयोग करतात.