शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

भारतीय हाच प्रत्येकाचा समाजधर्म असावा- फादर फ्रान्सिस दिब्रिटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 02:33 IST

महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत असताना दुसरीकडे प्रतिगामी शक्तींमुळे आपली वाटचाल मागच्या दिशेने होणार असेल, तर प्रगती कशी साधली जाणार?

आपल्या देशात निरक्षरता हा प्रश्न आ वासून उभा आहे. महाराष्ट्रातील अनेक खेड्या-पाड्यापर्यंत आजही आरोग्य सुविधा पोहोचलेल्या नाहीत. आरोग्य माणसाच्या मुलभूत गरजांपैकी एक असल्याने त्याकडे शासनाने लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. शुद्ध पाणी हीसुद्धा मुलभूत गरज आहे. भविष्यात पाण्याचा प्रश्न अधिकाधिक गंभीर होणार आहे. त्यामुळे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ यांसारख्या योजनांमध्ये शासनाप्रमाणेच लोकसहभागही असायला हवा. शासनाची धोरणे स्पष्ट आणि सुलभ असतील तर नागरिकही त्यामध्ये सहभागी होऊ शकतील. समाजातील श्रीमंत-गरीब ही दरी दिवसेंदिवस वाढत आहे. एखादी व्यक्ती वर्षाला ५-१० लाख रुपये कमावते, तर दुसरीकडे मजुराला रोजचा उदरनिर्वाह होईल एवढाही रोजगार मिळत नाही. ही विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. सध्या देश आर्थिक मंदी, बेरोजगारी अशा समस्यांचाही सामना करतो आहे. महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत असताना दुसरीकडे प्रतिगामी शक्तींमुळे आपली वाटचाल मागच्या दिशेने होणार असेल, तर प्रगती कशी साधली जाणार? अधोगती झाल्यास पुढील पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही. तरुणाईला सकारात्मक दिशा देण्यासाठी आपण सर्वांनी एकवटले पाहिजे.धार्मिक सहिष्णुता हा भारतीय संस्कृतीचा वारसा आहे. त्यामुळे गेल्या काही काळामध्ये सहिष्णुतेवर हल्ला करणाऱ्या घटनांमध्ये झालेली वाढ ही चिंतेची बाब आहे. भारतीय संविधानाने प्रत्येकाला काही हक्क आणि अधिकार दिले आहेत. नागरिकांच्या स्वातंत्र्यावर बाधा आणण्याचा अधिकार कोणालाही नाही. घटनेने आपल्यासमोर मोठे आणि उदात्त स्वप्न ठेवले आहे आणि सर्व भारतीयांना मिळून ते पूर्ण करायचे आहे. त्यामुळे देशात, राज्यात घडणारी प्रत्येक कृती ही संविधानातील मुल्यांना अनुसरुनच असली पाहिजे. धर्म हा वैयक्तिक साधनेचा मार्ग असतो. मात्र, सार्वजनिक जीवनात भारतीय हा एकच धर्म आहे. माणुसकी हे समाजाच्या जीवनाचे मूल्य असले पाहिजे. ख्रिश्चन हा माझा साधनेचा धर्म असला तरी भारतीय हा माझा समाजधर्म आहे. प्रत्येकाने त्यादृष्टीने विचार करायला हवा.सध्या सभोवतालचे वातावरण संशय आणि भयग्रस्त बनले आहे. स्त्रियांच्या हक्कांवर, माणसाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत आहे. स्त्रियांच्या हक्कांवर, प्रतिष्ठेवर होणारे हल्ले चिंतनीय आहेत. भारतीय संस्कृतीने स्त्रीला देवता मानले. समाज मात्र तिचे माणूसपणही नाकारतो आहे. स्त्रीला समानतेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे आहे. आदिवासी हेही समाजाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांच्या सक्षमीकरणासाठी, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाची धोरणे आखली गेली पाहिजेत.महाराष्ट्राला संतांचा वारसा लाभला आहे. संतपंरपरेने आपली संस्कृती समृद्ध केली. तुकोबांनी ‘जे का रंजले गांजले’ हा संदेश आपल्याला दिला. तुकोबांचे वचन हे देशाचे मुख्य धोरण झाले पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळाले; परंतु, ७० वर्षानंतरही स्वातंत्र्याची किरणे गरिबांच्या झोपडीपर्यंत पोचली की नाहीत, हा खरा प्रश्न आहे. गरिबांना हा देश आपला वाटला पाहिजे. स्वातंत्र्य ही आपली जबाबदारी असून, ती प्रत्येकाने जबाबदारीनेच जपली पाहिजे.