शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

इंडियन डेंटल असोसिएशनने मदरशातील विद्यार्थ्यांना दिले तंबाखूमुक्तीचे धडे

By admin | Updated: May 23, 2017 14:14 IST

इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए)ने तंबाखुसेवनाचे दुष्परिणाम नमूद करणारी आणि युवकांवर लक्ष केंद्रित करणारी एक महत्वाची मोहीम हाती घेतली आहे

स्नेहा मोरे / ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए)ने तंबाखुसेवनाचे दुष्परिणाम नमूद करणारी आणि युवकांवर लक्ष केंद्रित करणारी एक महत्वाची मोहीम हाती घेतली आहे. एक पाऊल पुढे जात आयडीएतर्फे इतरही मदरशांच्या विद्यार्थ्यांपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. आयडीए ही दंतचिकित्सा क्षेत्रातील सर्वात मोठी संघटना असून २९ राज्ये आणि सात केंद्राशासीत प्रदेशांसह तिचा राष्ट्रीय स्तरावर प्रभाव आहे. तिच्या देशभरात ४५० स्थानिक शाखा आहेत. आयडीएने मालाड येथील मालवणीमधील मदरसा जामिया अर्बिया मिन्हाजुल सुन्नाह येथे नुकतेच पहिले प्रात्यक्षिक दाखविले आणि बैठक घेतली.
 
या बैठकीमध्ये आयडीएचे मानद सरचिटणीस डॉ अशोक ढोबळे आणि त्यांच्या चमूने मदरशातील शिक्षकांबरोबरच युवा विद्यार्थ्यांना मौखिक आरोग्याचे महत्व पटवून दिले. त्याचबरोबर तंबाखूमुळे होणाऱ्या तोंडातील दुर्गंधी आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीचे उपाय उदधृत केले.
 
“आरोग्यपूर्ण दात तोंडात असतील तर तुम्हाला अन्न उत्तमपणे चावणे शक्य होते आणि तसे झाल्यास शरीरीकदृष्ट्या तंदुरुस्त राहता येते. या गोष्टींकडे कानाडोळा करणे चुकीचे आहे. सकाळी एकदा आणि रात्री झोपण्याआधी एकदा असे दिवसातून दोनदा दात घासा. तसे केल्यास तुम्हाला कित्येक रोग टाळता येवू शकतात,” असेही ते पुढे म्हणाले. प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी ब्रश आणि जबड्याच्या मॉडेलचा वापर केला गेला.
 
इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए)चे मानद सरचिटणीस श्री ढोबळे यांनी याधीही अनेक अशाप्रकारचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यावेळी केवळ स्थळ आणि त्यांच्यासमोरील प्रेक्षक बदलले होते. इमाम, धर्मगुरू आणि शिक्षक बनण्यासाठी आलेल्या मुलांसमोर यावेळी त्यांनी प्रात्यक्षिके हाती घेतली होती. “मी पहिल्यांदाच मदरशाला भेट दिली आणि येथील मुलांना संबोधित केले. शहरात आणखी असे बरेच कार्यक्रम आम्ही आयोजित करणार आहोत,” असेही ढोबळे म्हणाले. आयडीएच्या काही महिला दंतचिकित्सक इतर मदरसांमध्ये काम करण्यास सज्ज आहेत. त्यासाठी मालाड येथील शाळेचे प्राध्यापक मौलाना नौशाद आलम यांच्या संपर्काचा वापर करून इतर मदरसांमध्ये अशी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.   
 
मदरसांमध्ये अशा प्रकारची मौखिक जागरुकता शिबिरे घेणे अत्यंत महत्वाचे आहे. समाजाच्या योगदानावर चालविली जाणारी आणि पायाभूत सुविधांची वानवा असलेली ही विद्यालये आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या चमू आणि व्यक्तींच्या समाजोपयोगी कामांपासून वंचित आहेत. अशाप्रकारचे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. यातील बरचसे मदरसे हे दाट वस्त्यांमध्ये वसले असून ते अमली पदार्थविक्री करणाऱ्याचे आणि गर्दुल्यांचे अड्डे झाले आहेत. आरोग्य निगेसाठी जागृती शिबिरे घेणे अत्यंत महत्वाचे ठरले आहे. म्हणूनच तंबाखूरहित आरोग्याचा मंत्र देत असताना ढोबळे यांनी मुलांना अमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणामही नमूद केले. “अमली पदार्थ तुम्हाला हळू हळू मारतात. ते आधी तुमच्या संवेदना मारतात आणि मग तुमच्यातील काहीही करण्याची शक्तीच काढून घेतात. तुम्ही तुमचे कुटुंब आणि समाजासाठी एक बोजा बनून राहता. जर तुम्ही या विळख्यात अडकला असाल तर ही सवय सोडून द्या,” ते म्हणाले. त्यांनी विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक या दोघानांही पान आणि गुटख्यापासून दूर राहण्याचे आणि अशा सवयी सोडून देण्याचे आवाहन केले.
 
अरेबिक शिक्षक मौलाना अब्दुल कादिर यांना हा सल्ला मनोमन पटला. “मी आता पानही सोडण्याचा विचार करत आहे,” ते हसत हसत म्हणाले. त्यांच्या दातांवर त्यांच्या अनारोग्यापूर्ण सवयीच्या खुणा स्पष्ट जाणवत होत्या.
 
एजाज अली (१४), हिफ्झ (कुराणचे पाठांतर) अभ्यासक्रमाचा विद्यार्थी आहे. त्याने मदरशामधील अभ्यासक्रमामध्ये मौखिक आरोग्य शिकविले जात नाही, असे जेव्हा मान्य केले तेव्हा त्याला त्याच्या कित्येक सहकाऱ्यांनी अनुमोदन दिले. विद्यार्थ्यांसाठी अशाप्रकारच्या माहितीपूर्ण सत्रांचे आयोजन केले गेले पाहिजे, असेही तो म्हणाला. आम्ही सकाळपासून अगदी मध्यरात्रीपर्यंत अभ्यासात गढून जातो. जेव्हा आम्हाला कोणी सांगतो की आपले कपडे स्वच्छ ठेवण्याबरोबरच आपले दात चकचकीत ठेवणेही गरजेचे आहे, तेव्हा ते आमच्या सोयीचे ठरते,” असेही अली यांनी पुढे म्हटले.
 
“इतर वाईट सवई आणि घटकांपासून स्वतःला कसे वाचवावे याचे धडे विद्यार्थ्यांना मिळालेच, पण त्याचबरोबर मदरशांनाही त्यांनी रोग आणि वाईट गोष्टी कशा बाजूला ठेवाव्यात याचे धडे देणे गरजेचे होते. वाईट मौखिक निगेमुळये उद्भवणारे रोग हा याच रोगांचा एक भाग आहे,” असे एका शिक्षकाने यावेळी म्हटले.
 
“आपल्या स्वतःच्या सदस्यांमध्ये व्यावसायिक सुधारणा घडवून आणताना देशातही कमाल मौखिक आरोग्य कसे सध्या होईल, यावर आमचा पूर्ण भर असतो आणि तेच आमचे मिशन आहे. मौखिक आरोग्यावर आयडीएचा पूर्ण विश्वास आहे आणि २०२० पर्यंत प्रत्येक भारतीयाला किमान मौखिक आरोग्य प्राप्त करून देणे या आपली ध्येयाप्रती ती सातत्यपूर्णपणे काम करत असते,” असेही डॉ अशोक ढोबळे यांनी स्पष्ट केले.