शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भारत यात्रा : बाल अत्याचारविरुध्द ‘सुरक्षित बालपण...सुरक्षित भारत’ची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 11:37 IST

नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त कैलास सत्यार्थी यांच्या नेतृत्त्वाखाली ‘भारत यात्रे’च्या स्वरुपात राष्टÑव्यापी मोर्चा ११ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. याअंतर्गत अद्याप भारत यात्रेच्या सहा गटांनी तेलंगाणा, आंध्रप्रदेश छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश आदि राज्यांमधून मार्गस्थ होत बाल शोषण व लैंगिक अत्याचाराच्या भीषण समस्येविरुध्द जनजागृती करत नागरिकांचे लक्ष वेधले

ठळक मुद्देकिसी भी बालक, महिलाके खिलाफ अत्याचार व शोषण देखता हूं तो आवाज उठाऊं गा...’ अशी शपथ ‘भारत यात्रा’फेरीने शहरातील रस्त्यांवरून मार्गक्रमण करत ‘सुरक्षित बालपण, सुरक्षित भारत’ची हाक नाशिककरांना दिली.

नाशिक : ‘मैं भारत को सुरक्षित बनाने के लिये, प्रयास करुंगा, किसी भी बालक, महिलाके खिलाफ अत्याचार व शोषण देखता हूं तो आवाज उठाऊं गा...’ अशी शपथ घेत शेकडो बालक व विद्यार्थी एकत्र आले. बाल अत्याचाराविरुध्द जनजागृतीच्या उद्देशाने ‘भारत यात्रा’फेरीने शहरातील रस्त्यांवरून मार्गक्रमण करत ‘सुरक्षित बालपण, सुरक्षित भारत’ची हाक नाशिककरांना दिली.नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त कैलास सत्यार्थी यांच्या नेतृत्त्वाखाली ‘भारत यात्रे’च्या स्वरुपात राष्टÑव्यापी मोर्चा ११ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. याअंतर्गत अद्याप भारत यात्रेच्या सहा गटांनी तेलंगाणा, आंध्रप्रदेश छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश आदि राज्यांमधून मार्गस्थ होत बाल शोषण व लैंगिक अत्याचाराच्या भीषण समस्येविरुध्द जनजागृती करत नागरिकांचे लक्ष वेधले आहे. भारत यात्रेचे सहा गट देशभर प्रवास करत असून सत्यार्थी यांचे पुत्र भुवन रिभू हे स्वत: शहरात रविवारी (दि.१) भारत यात्रेच्या जथ्थ्यासह दाखल झाले.

शहरातील एन.जी.ओ. फोरमच्या विविध स्वयंसेवी संस्थांसह परिचारिका महाविद्यालयांच्या विद्यार्थिनी, महापालिका व खासगी शाळांचे विद्यार्थी ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येने जमले होते. दरम्यान, रिभू यांनी उपस्थितांना बाल शोषणाविरुध्द आवाज उठविण्याची शपथ दिली. याप्रसंगी महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृह नेता दिनकर पाटील, नगरसेवक डॉ. हेमलता पाटील, सामाजिक कार्यकर्ते मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, निशिकांत पगारे आदि उपस्थित होते.रिभू यांनी यावेळी प्रास्ताविकातून भारत यात्रा व त्यामागील उद्देश समजावून सांगितला. यानंतर मैदानावरून भारत यात्रा फेरीला प्रारंभ करण्यात आला. यात्रा ईदगाह मैदान, त्र्यंबकरोडने, अण्णा भाऊ साठे चौकातून मार्गस्थ होत शालीमार, नेहरू उद्यानामार्गे एम.जी.रोडवरून सीबीएसमार्गे ईदगाह मैदानावर सकाळी अकरा वाजता यात्रेचा समारोप करण्यात आला.