शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
6
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
7
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
8
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
9
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
10
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
11
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
12
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
13
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
14
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
15
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
16
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
17
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
18
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
19
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर

महासत्तेबरोबर भारत विश्वमित्र व्हावा, विश्वासार्हतेत भारतच अव्वल : मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 3:43 AM

इतर देशांना उद्ध्वस्त करणार नाही, अशी महासत्ता बनतानाच भारताने विश्वाचे मित्र बनून जगाचे नेतृत्व करायला हवे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी येथे केले. देशांची श्रीमंती पैशांनी मोजली जाते; पण विश्वासार्हता आणि अन्य मूल्यांबाबत भारतच जगात अव्वल असल्याचे ते म्हणाले.

विशेष प्रतिनिधी मुंबई : इतर देशांना उद्ध्वस्त करणार नाही, अशी महासत्ता बनतानाच भारताने विश्वाचे मित्र बनून जगाचे नेतृत्व करायला हवे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी येथे केले. देशांची श्रीमंती पैशांनी मोजली जाते; पण विश्वासार्हता आणि अन्य मूल्यांबाबत भारतच जगात अव्वल असल्याचे ते म्हणाले.आयएमसी चेम्बर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रिजच्या वतीने डॉ. भागवत यांचे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या सभागृहात ‘राष्ट्रीयत्व आणि व्यावसायिक नीतिमत्ता’ या विषयावर व्याख्यान झाले. भागवत म्हणाले की, जगात भारतीय माणूस कुठेही गेला तरीही त्याचे स्वागत केले जाते आणि त्याच्याकडे आदराने बघितले जाते. भारतीयांनी प्राप्त केलेली ही विश्वासार्हता आहे. व्यापार, व्यवसाय हा एक धर्म आहे आणि त्याची काही नीतिमूल्ये असतात हे भारतीय समाज पूर्वापार मानत आला आहे.ते म्हणाले की, जगातील काही प्रगत देशांमध्ये आज ‘शट डाउन’ची वेळ आलेली असताना भारतीयांमध्ये सत्त्व जागृत झाले आहे. ‘आम्ही काही करू शकत नाही’ या पराभूत मानसिकतेतून भारतीय समाज बाहेर आला आहे. आमचा इतिहास, शौर्य, आमचे गुणविशेषांच्या सत्त्वावर इंग्रजांनी घाला घातला. आज ते पुन्हा जागृत झाले आहे. आम्ही करू शकतो; नव्हे आम्हीच करू शकतो हा भाव निर्माण झाला आहे. सीएसआर ही संकल्पना आज कायद्याने आणली गेली असली तरी ती भारतीय समाजात फार पूर्वीपासून आहे. आपल्यासोबतच आपल्या समाजाची समृद्धी साधली जावी, हेच आमचा व्यापारधर्म सांगत असल्याचे भागवत म्हणाले.म्हणून जपान महासत्ता-देशभक्ती, सर्व समाज एक परिवार असल्याची भावना, आर्थिक प्रगतीसाठी कुठलेही साहस करण्याची तयारी आणि विकासासाठी जोखीम पत्करण्याची तयारी यामुळे जपान महासत्ता बनू शकला. हे उदाहरण आमच्यासमोर आहे, असे सरसंघचालक म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ