शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

मंत्रिमंडळ विस्तारावर भारत-पाक सामन्याचे सावट; लगेचच कॅबिनेट बैठकीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 11:01 IST

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आठ मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे. मात्र, भारत-पाकिस्तान सामन्याचा धसका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेचच कॅबिनेट बैठक घेण्यात येणार आहे. 

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आठ मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. आज एकूण 13 जणांचा शपथविधी संपन्न होईल. यामध्ये विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचादेखील समावेश आहे. सोमवारपासून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरू होत आहे.मात्र, भारत-पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना असल्याने पत्रकार परिषद आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयांकडे कोणी फारसे लक्ष देणार नाही, अशी भीती भाजपाच्या वरिष्ठांना वाटत आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेचच बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आधी सायंकाळी 6 वाजता ठरलेली पत्रकार परिषद दुपारी तीन वाजता घेण्यात येणार आहे. याचबरोबर एकीकडे भाजपचे मंत्री शपथ घेत असताना दुसरीकडे विरोधी पक्षांचीही बैठक सुरु होणार आहे. तसेच दुपारी 1 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील आठ जणांचं मंत्रिपद जाणार आहे. यामध्ये गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अमरिश आत्राम यांच्यासह आणखी दोघांना नारळ देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस शनिवारी दिल्लीत जातील व मंत्रिमंडळाच्या यादीवर शिक्कामोर्तब करतील, रविवारी विस्तार होईल, हे वृत्त ‘लोकमत’नं दिले होतं. मुख्यमंत्री शुक्रवारी रात्री अचानक उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीला गेले. तेथून बाहेर पडताच त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झाल्याचे ट्विट केले होते.

पहिल्या शपथेचा मान विखे पाटलांनापहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना देण्यात आला असून दुसरा क्रमांक जयदत्त क्षीरसागर आणि तिसरी शपथ आशिष शेलार यांना देण्यात येणार आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस