पुणो : अंधश्रद्धा निमरूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासासाठी पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी ‘प्लँचेट’चा प्रयोग केल्याच्या आरोपाची स्वतंत्र अधिका:यामार्फत चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर नागोरी व खंडेलवाल प्रकरणातही प्लँचेटचा वापर झाल्याचे आरोप होत असल्याने त्याचीही चौकशी होईल. या चौकशीत तथ्य आढळल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी दिले.
पाचगाव पर्वती (तळजाई) येथे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमानंतर आर. आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत हे आश्वासन दिले. प्लँचेट प्रकरणाची चौकशी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिका:यमार्फत सुरू आहे. येत्या आठ दिवसांत त्यांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर शस्त्रतस्कर विकास खंडेलवाल व मनिष नागोरी यांच्या तपासातही प्लँचेटचा आधार घेऊन त्यांना अटक केल्याचा आरोप आहे. परंतु, त्याचीही चौकशी हेच अधिकारी करतील. सध्यातपास सुरू असल्याने मी अधिक बोलणो योग्य नाही. असे ते म्हणाले.
वाढीव जागांची मागणी लोकसभा निकालानुसार
विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा करणा:या काँग्रेसने ‘बळ किती राहिले,’ याचा विचार करावा. गेल्या लोकसभा निवडणुकीला अधिक जागा निवडून आल्यामुळे काँग्रेसने विधानसभेच्या जादा जागा मागितल्या होत्या. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा अधिकच्या जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे पूर्वीच्या न्यायाप्रमाणो आता काँग्रेसनेही राष्ट्रवादीला जादा जागा सोडल्या पाहिजेत. राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्याकडूनही स्वबळावर लढण्याची मागणी होत आहे. परंतु, त्याविषयीचा अंतिम निर्णय शरद पवार हे घेतील, असे आर. आर. पाटील यांनी सांगितले.