नागपूर : आॅटोरिक्षा चालक कल्याणकारी मंडळासाठी स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास समितीने पाच महिन्यांपूर्वीच कल्याणकारी मंडळाचा प्रारूप अहवाल सादर केला, मात्र, यावर अद्याप कुठलाच निर्णय झाला नाही. आॅटोचालकांच्या प्रलंबित मागण्या सोडवा, अन्यथा येत्या स्वातंत्र्य दिनापासून राज्यपातळीवर बेमुदत संप पुकारण्याचा इशारा विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनने दिला आहे. आॅटोरिक्षचालकाला जनतेचा सेवक असे संबोधले जाते, परंतु शासन त्याला नागरी सेवेचा दर्जा देत नाही. पेन्शन, आरोग्य विमा योजना, मुलांच्या शिक्षणासाठी मदत आदी पोकळ आश्वासनच देत आल्याची टीका रिक्षाचालक संघटनांनी केली. आॅटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीची बैठक अलीकडेच पुण्यात पार पडली. समितीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास १५ आॅगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला. कल्याणकारी मंडळाचा लाभ टॅक्सीचालकांनाही होणार असल्याने त्यांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. आढाव यांनी केले. महासचिव आनंद चवरे यांनी सांगितले, या आंदोलनात विदर्भातील ८० हजार आॅटोचालक सहभागी होतील. बैठकीत समितीचे सरचिटणीस नितीन पवार, फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर, संघटक रवी तेलरांधे, शेख अब्बास, अरुण हिरेखण, भारमल स्वामी, मधुकर थोरात आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)या आहेत मागण्याआॅटोरिक्षा चालक कल्याणकारी योजना लागू करावी.या आहेत मागण्याआॅटोरिक्षा चालक कल्याणकारी योजना लागू करावी.विद्यार्थी वाहतुकीतून रिक्षांना हद्दपार करण्याचा शासनाचा निर्णय मागे घेण्यात यावा.रिक्षांसाठी असलेली कालमर्यादेची अट रद्द करावी, जुन्या बॅजधारकांना परवाना द्यावा.मीटर कंपन्यांकडून होणारी लूट थांबवावी.१६ वर्षापर्यंत आॅटोची मुदत रद्द करावी.अवैध वाहतूक बंद करावी
-तर स्वातंत्र्य दिनापासून आॅटोरिक्षांचा बेमुदत बंद
By admin | Updated: July 21, 2014 00:57 IST