शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

'इंदू सरकार' विरोधात काँग्रेस आक्रमक; सिनेमाचे शो पाडले बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 12:12 IST

मुंबई, दि. 28- मधूर भांडारकर दिग्दर्शित इंदू सरकार हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गुरूवारी सुप्रीम कोर्टाने सिनेमा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला असला तरीसुद्धा सिनेमाच्या मार्गातील अडचणी काही दूर होत नाही आहेत. शुक्रवारी सकाळी सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सिनेमाला काँग्रेसकडून विरोध होताना पाहायला मिळतो आहे. विरोध दर्शविण्यासाठी ठिकठिकाणी काँग्रेसकडून निदर्शनं केली ...

ठळक मुद्देसुप्रीम कोर्टाने सिनेमा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला असला तरीसुद्धा सिनेमाच्या मार्गातील अडचणी काही दूर होत नाही आहेत. शुक्रवारी सकाळी सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सिनेमाला काँग्रेसकडून विरोध होताना पाहायला मिळतो आहेविरोध दर्शविण्यासाठी ठिकठिकाणी काँग्रेसकडून निदर्शनं केली जात आहेत.

मुंबई, दि. 28- मधूर भांडारकर दिग्दर्शित इंदू सरकार हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गुरूवारी सुप्रीम कोर्टाने सिनेमा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला असला तरीसुद्धा सिनेमाच्या मार्गातील अडचणी काही दूर होत नाही आहेत. शुक्रवारी सकाळी सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सिनेमाला काँग्रेसकडून विरोध होताना पाहायला मिळतो आहे. विरोध दर्शविण्यासाठी ठिकठिकाणी काँग्रेसकडून निदर्शनं केली जात आहेत. ठाणे, जळगाव तसंच नाशिकमध्ये सिनेमाला जिल्हा काँग्रेसकडून विरोध केला जातो आहे. ठाण्यामध्ये आज सकाळी असणारा सिनेमाचा शो काँग्रेसकडून बंद करण्यात आला. तर नाशिकमधील फेम थिएटरसमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शनं केली जात आहेत. जळगावमधील काही सिनेमागृहामधील सिनेमाचे शो बंद पाडण्यात आले आहेत. तर नांदेडमध्येही काँग्रेसच्या विरोधानंतर सिनेमाचा पहिला शो रद्द करण्यात आला आहे. कल्याणच्या आयनॉक्स थिएटरमधील शोही बंद पाडण्यात आला आहे. कल्याणमधील काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं आहे. कल्याणच्या मेट्रो मॉलमधील आयनॉक्स थिएटरमध्ये सकाळी १०.१५ मिनिटांचा हा पहिला शो होता. हा शो सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते आत घुसले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. “मोदी सरकार हाय हाय, मधुर भांडारकर हाय हाय..जब ताक सूरज चांद रहेजा इंदिरा तेरा नाम रहेगा” अशा घोषणा देत हा शो बंद पाडला. तसेच मधुर भांडारकरच्या फोटोला चपला मारून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला राग व्यक्त केला. भाजपच्या सांगण्यावरून हा चित्रपट बनवण्यात आला आहे. या चित्रपटातून इंदिरा गांधींची प्रतिमा मलिन करण्याचं काम करण्यात आले असून हा मधुर नव्हे तर मोदी भांडारकर असल्याची टीका काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी  बोलताना केली. दरम्यान या प्रकाराची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतले.                        

याआधीही सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान काँग्रेसकडून सिनेमाला विरोध झाला आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उढळून लावल्या होत्या.

पुण्यात एका हॉटेलमध्ये सिनेमाची पत्रकार परिषद सुरु असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी राडा घातला होता. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये घुसून आंदोलन केलं. गोंधळामुळे पत्रकार परिषद रद्द करावी लागली होती. 

सुप्रीम कोर्टाचा सिनेमा प्रदर्शनाला ग्रीन सिग्नलसुप्रीम कोर्टाने इंदू सरकार या सिनेमाच्या प्रदर्शनात येणारे अडथळे हटवत सिनेमा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला आहे. सुप्रीम कोर्टाने सिनेमाच्या प्रदर्शनाला मंजूरी दिली असून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार शुक्रवारीच सिनेमा प्रदर्शित झाल आहे.स्वत:ला संजय गांधी यांची मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या प्रिया पॉल यांनी दिग्दर्शक मधूर भंडारकर यांच्या ‘इंदू सरकार’ या सिनेमाचं प्रदर्शन थांबविण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. गुरूवारी या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने प्रिया पॉल यांची याचिका रद्द केली. न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन जणांच्या खंडपीठाने म्हंटलं, मधूर भांडारकर यांचा इंदू सरकार हा सिनेमा  1975-77च्या आणीबाणीवर आधारीत आहे. पण हा सिनेमा कायद्याच्यादृष्टीने 'काल्पनिक अभिव्यक्ती' असून हा सिनेमा प्रदर्शन होऊ न देण्याचं कोणतंही कारण नाही. तर दुसरीकडे, सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतलेलं दृश्य सिनेमातून काढून टाकलं असून हा सिनेमा पूर्णपणे साफ आहे. कोणत्याही जीवित किंवा मृत व्यक्तीबरोबर याचा काहीही संबंध नसल्याचं मधूर भांडारकर यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. इंदू सरकार हा सिनेमा कायद्याच्यादृष्टीत पूर्णपणे काल्पनिक असून सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याचं कोणतंही कारण नाही, असं न्यायमुर्ती दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने सांगितलं.