डहाणू : वाढवण बंदरांच्या सर्व्हेचे काम पोलिस संरक्षण करण्याच्या पालघर जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशामुळे येथील वाढवण बंदर विरोधी आंदोलन अधिकच भडकण्याची चिन्हे दिसू लागली असून, सरकारने जबरदस्ती केली तर हे आंदोलन अधिक तीव्र करून सर्व्हेसाठी कोणालाही या भागात पाय ठेवू दिला जाणार नाही अशी भूमिका संघर्ष समितीने आणि महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने घेतली आहे. वाढवण बंदर उभरणाऱ्या जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट अणि महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड यानी वाढवणच्या उभारणी पूर्वी त्याचा विकास आराखडा तयार करण्यासाठी येथील ेटोपोग्राफिकल सर्व्हेचे काम करण्याकरिता दोन कंपन्याची नियुक्ती केली आहे. या कंपन्यांच्या वाढवण बंदराच्या सर्व्हेच्या कामात संघर्ष समितीने अडथळा आणू नये म्हणून जे.एन.पी.टी. व जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांच्या १६ आॅगस्ट २०१६ च्या पत्राने पोलिस अधिक्षक पालघर उपविभागीय दंडाधिकारी डहाणू कार्यकारी दंडाधिकारी डहाणू याना जेएनपीटी, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड अणि त्यांची नेमून दिलेल्या इतर कंपन्याना संरक्षण पुरविण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे वाढवण बंदराविरोधात शांततेने आणि अहिंसक मार्गाने चाललेले आंदोलन चिरडून टाकण्याचा सरकारचा डाव असल्याने हे आंदोलन आता वेगळ्या वळणावर जाणार आहे. दरम्यान, सर्वेक्षणाच्या आदेशामुळे डहाणूच्या पश्चिम भागातील पंचवीस गावात अस्वस्थता असून हजारो नागरिक तीव्र आंदोलन करण्याचा तयारीत आहे . (वार्ताहर) >लाखो लोकांना नोकरीचे आश्वासन देण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने तरुणांना नोकरी तर दिली नाही परंतु शेती, मासेमारी, डायमेकिंगचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या गोर गरिबांना देशोधडीला लावण्याचे काम सरकारने करू नये राष्ट्रवादी कॉंग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल - आनंद भाई ठाकूर, आमदार (डहाणू)
वाढवणचा सर्व्हे पोलीस संरक्षणात
By admin | Updated: August 24, 2016 03:13 IST