शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
4
या देशाने आधीच भारतासोबत पंगा घेतला होता, आता पाकिस्तानचा उल्लेख करून ट्रम्प यांची स्तुती केली
5
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
6
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
7
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
8
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
9
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
10
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
11
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
12
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
13
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
14
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
15
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
16
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
17
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
18
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
19
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
20
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

सागरी गस्तीमध्ये वाढ

By admin | Updated: September 24, 2016 02:17 IST

उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर उरण येथे संशयित दहशतवादी दिसल्याच्या चर्चेने मुंबईसह नवी मुंबईच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली

सूर्यकांत वाघमारे,

नवी मुंबई- उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर उरण येथे संशयित दहशतवादी दिसल्याच्या चर्चेने मुंबईसह नवी मुंबईच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्याकरिता नवी मुंबईला १०४ किमीचा सागरी किनारा लाभलेला असून, त्याचीही गस्त वाढवण्यात आली आहे. याकरिता सागरी पोलिसांबरोबरच सीआरपीएफ यांच्यातर्फे बोटीने गस्त घालण्यात येत आहे.दहा महिन्यांपूर्वी उरण परिसरात काडतुसे असलेली पेटी आढळली होती. त्यानंतर गुरुवारी संशयित दहशतवादी घुसल्याच्या चर्चेने उरण पुन्हा चर्चेत आले आहे. हे संशयित दहशतवादी समुद्रामार्गे घुसल्याची शक्यता असल्याने गस्त घालण्यासाठी सागरी पोलिसांच्या सात बोटी किनाऱ्यावर गस्त घालत आहेत. त्यांच्याकडून शहराच्या संपूर्ण किनारपट्ट्या, जेट्टींचीही पाहणी करण्यात येत आहे. मात्र अद्याप त्यांनाही संशयास्पद काहीच आढळलेले नाही. याकामी पोलिसांच्या मदतीला सागरी सुरक्षा दल, मच्छीमार बांधवही धावून आलेले आहेत. त्यांच्याकडून देखील सागरी किनारी भागावर लक्ष ठेवले जात आहे. अनेक मच्छीमार बांधवांच्या बैठका घेवून त्यांच्याकडेही चौकशी करण्यात आलेली आहे. परंतु त्या दोन विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर कोणीच संशयित दहशतवादी पाहिलेले नाहीत. शिवाय दोन दिवसांत पोलिसांनी संपूर्ण उरण शहर व लगतचा भाग पिंजून काढलेला आहे. जर दहशतवादी असते तर ते एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या कोम्ब्ािंग आॅपरेशनमध्ये आढळून आले असते, अशी शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे पोलिसांव्यतिरिक्त उरणमध्ये आलेली फौज परत पाठवण्यात आली असून आवश्यकता भासल्यास त्यांना बोलावले जाणार आहे.>उरणमध्ये संशयित दहशतवादी घुसल्याच्या शक्यतेवरून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची सागरी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सागरी किनाऱ्यावर गस्त घालण्यासाठी ७ बोटी कार्यरत करण्यात आल्या आहेत. त्यांच्यामार्फत जेट्टीच्या ठिकाणांची देखील देखरेख करण्यात येत आहे. - नितीन पवार, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा.