शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पावसाचा जोर वाढला

By admin | Updated: July 1, 2016 04:08 IST

कोकणासह विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

पुणे : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. कोकणासह विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर वगळता पश्चिम महाराष्ट्रात मात्र अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. येत्या ४८ तासांत कोकण वगळता इतर ठिकाणी पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने महाराष्ट्रात बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणात वाहत आहेत. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर जास्त आहे. गेल्या २४ तासांत विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. बल्लारपूर येथे सर्वाधिक २३० मिमी पाऊस झाला. मराठवाड्यात हिंगोलीआणि नांदेड जिल्ह्यात पावसाचा जोर होता. दमदार पावसाने नद्या-ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. त्यापाठोपाठ विदर्भात राजुरा येथे २२०, तर कोकणात कणकवलीमध्ये १४०, हर्णे, पोंभुर्णा येथे ११०, मुरूड येथे १०० मिमी पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यातही सर्वदूर पाऊस झाला. शहरात पावसाचा जोर चांगला होता. गेल्या चोवीस तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ५६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मुंबईतही दिवसभरात दमदार पाऊस झाला. विशेषत: ठाणे, नवी मुंबई परिसरात जोरदार सरी बरसल्या. (प्रतिनिधी)>गेल्या २४ तासांतील राज्यातील पाऊस (मिमीमध्ये) : बल्लारपूर २३०, राजुरा २२०, कणकवली १४०, सेलू १२०, हर्णे, पोंभुर्णा ११०, मुरूड १००, दापोली, गुहाघर, खेड, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वैभववाडी, वसमत ९०, देवगड, रत्नागिरी, वेंगुर्ला, भद्रावती, चामोर्शी, पांढरकेवडा, वरोरा ८०, पालघर, राजापूर, किनवट, देवळी, कोपर्ना ७०, संगमेश्वर, श्रीवर्धन, गगनबावडा, हिंगोली, जिंतूर, चंद्रपूर ६०, चिपळूण, रोहा, आजरा, महाबळेश्वर, नांदगाव, राधानगरी, अंबड, हादगाव, हिमायतनगर, अंजनगाव, बार्शी, भामरागड, चांदूर, शिंहेवाडी, वणी ५०, भिरा, चंदगड, महूर, नांदेड, दर्यापूर, उमरखेड, यवतमाळ ४०. >वीज पडून मृत्यूतलावात दुचाकी धुण्यासाठी मित्रासोबत गेलेल्या विद्यार्थ्याचा गुरुवारी वीज पडून मृत्यू झाला. ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील हेडरी (ता. एटापल्ली) येथे दुपारी ३च्या सुमारास घडली. मीरवा दुलसा लेकामी (रा. हेडरी) असे त्याचे नाव आहे. तो पंदेवाही येथील विनोबा आश्रमशाळेत इयत्ता आठवीत शिकत होता.>नांदेडमध्ये पुरात अडकलेल्या चौघांची सुटका नांदेड औंढा व वसमत तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने आसना नदीला पूर आला आहे. सांगवी बंधारा येथील पंप हाउसला पाण्याने वेढा दिल्याने पुरात महापालिकेचे चार पंप आॅपरेटर अडकून पडले होते.आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने सात तासांनंतर त्यांची सुखरूप सुटका केली. विष्णुपुरी जलाशयाची पाणीपातळी खालावल्याने अर्ध्या नांदेड शहराला सांगवी येथील पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी सोडण्यात येत आहे़