शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या संसर्गामुळे बूस्टरला मिळणार गतीवैद्यकीय तज्ज्ञांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 08:55 IST

कोरोनाच्या तिसऱ्या लाटे नंतर कोरोनाचा विषाणू गेला या सामान्यांच्या मानसिकतेमुळे लसीकरणाची गती कमी झाली होती.

मुंबई : मुंबईसह राज्यात १० जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच ६० वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली.  कोविड पोर्टल नुसार मुंबईत आतापर्यंत ७.०१ लाख नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आला आहे.

राज्याने आतापर्यंत १८ ते ५९ वयोगटातील ३,१२,१९२ बूस्टर डोस दिले होते. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता बूस्टर डोस मोहिमेला गती मिळेल असा विश्वास वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटे नंतर कोरोनाचा विषाणू गेला या सामान्यांच्या मानसिकतेमुळे लसीकरणाची गती कमी झाली होती. शिवाय, शहरांमधील स्थलांतर ही वाढल्याने लसीकरणाकडे अनेकांनी पाठ फिरवली होती. मात्र आता संसर्ग वाढत आहे. 

बूस्टर डोस कोणासाठी आवश्यक?-    ज्या ६० वर्षांवरील व्यक्ती सहव्याधींनी ग्रस्त आहेत, त्यांनाच हा डोस देण्यात येणार आहे. या २२ व्याधींची यादी केंद्र सरकारने जाहीर केली आहे. -    आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर आणि विविध आजार असलेल्या ६० वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना ही लस सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत देण्यात येणार आहे.-    मात्र खासगी हॉस्पिटल्स आणि खासगी लसीकरण केंद्रांवर यासाठी पैसे मोजावे लागतील. -    ज्यांचे दोन डोस घेऊन नऊ महिने म्हणजेच ३९ आठवडे झाले आहेत, त्यांनाच हा तिसरा बूस्टर डोस घेता येणार आहे. 

-    या मोहिमेत महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन भेटी देण्यात येत आहेत. दरम्यान, मुंबईतील सर्व पात्र नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे. त्याचप्रमाणे आपल्या पात्र पाल्यांचे देखील लसीकरण पूर्ण करून घ्यावे,असे आवाहन अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस