शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

गॅस दरवाढीने मुंबईकरांचा पारा वाढला !

By admin | Updated: March 4, 2017 02:07 IST

मुंबईच्या तापमानात घरगुती गॅसची दरवाढ आणि खासगी बँकांनी सुरू केलेली भरमसाठ शुल्कवाढीची भर पडल्याने मुंबईकरांचा पारा चांगलाच वाढला आहे.

मुंबई : मुंबईच्या तापमानात घरगुती गॅसची दरवाढ आणि खासगी बँकांनी सुरू केलेली भरमसाठ शुल्कवाढीची भर पडल्याने मुंबईकरांचा पारा चांगलाच वाढला आहे. या दरवाढ आणि शुल्कवाढीचा सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून खरपूस समाचार घेतला जात आहे. मुंबईकरांची हीच खदखद हेरून मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दरवाढीविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. भविष्यात बँकांसमोरून गेले तरी शुल्क आकारले जाईल, अशा शब्दांत खासगी बँकांनी केलेल्या शुल्कवाढीवरून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे. याउलट दहशतवाद रोखण्यासाठीच नोटाबंदीप्रमाणे गॅस दरवाढ केल्याचे विनोद सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. एकंदरीतच निवडणुकांनंतर झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांमधून सरकारविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. त्याचा फायदा विरोधी पक्ष कितपत घेणार, हे भविष्यात होणाऱ्या आंदोलनांवरून स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)>आझाद मैदानात निदर्शनेगॅस दरवाढ आणि चारपेक्षा जास्त वेळा बँकेतून पैसे भरणे आणि काढण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीकडून शनिवारी, ४ मार्चला दुपारी १२ वाजता आझाद मैदानात निदर्शने करण्यात येणार आहेत. दरम्यान, बँक शुल्कवाढ आणि गॅस दरवाढीविरोधात नेटकऱ्यांनी जहाल प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. सोशल मीडियावर प्रामुख्याने या दरवाढीमुळे भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्यात आले आहे.